सूर्यकुमार यादव आणि अभिषेक शर्मा(फोटो-सोशल मीडिया)
भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने जोश हेझलवूडचा धक्का मान्य करत म्हटले की, “त्याने निश्चितच उत्तम काम केले. हेझलवूडने पॉवर-प्लेमध्ये ज्या पद्धतीने गोलंदाजी केली आणि जर तुम्ही सुरुवातीला चार विकेट्स गमावल्या तर त्यातून सावरणे खूप कठीण होऊन जाते. हेझलवूडला सर्व श्रेय द्यायला हवे. त्याने खरोखरच चांगली गोलंदाजी केली.”
अभिषेक शर्माने या सामन्यात शानदार खेळी केली. परंतु, टोपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. त्याच्या या खेळीबद्दल यादव म्हणाला की, “तो गेल्या काही काळापासून संघासाठी हे करत आहे. त्याला त्याचा खेळ माहित असून त्याच्या ओळखीची चांगली जाणीव आहे. यामध्ये चांगली गोष्ट म्हणजे तो बदलत नाही आणि त्यामुळेच त्याला यश मिळत जाते. आशा आहे की, या शैलील तो चिकटून राहील आणि संघासाठी अशा आणखी खेळी खेळेल.”
पुढील सामन्यात काही बदल करण्यात येतील का? असा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा सूर्यकुमार म्हणाला की, “आम्हाला पहिल्या सामन्यात जे केले होते तेच करावे लागणार आहे. आम्हाला चांगली फलंदाजी करावी लागेल. जर आम्ही प्रथम फलंदाजी केली तर आम्हाला शक्य तितक्या धावा करून त्यांचा बचाव करावा लागणार आहे.”






