 
        
        जेमिमा रॉड्रिग्ज(फोटो-सोशल मीडिया)
Nasser Hussein’s post about Jemima Rodriguez goes viral : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळली जात आहे. शुक्रवारी या मालिकेतील दूसरा सामना मेलबर्न येथे खेळला गेला. या सामन्यात टॉस गमावणाऱ्या भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत ऑस्ट्रेलियासमोर १२५ धावांचे लक्ष्य उभे केले होते. प्रतिउत्तरात ऑस्ट्रेलिया संघाने १३.२ ओव्हरमध्ये ६ गडी गमावत हे लक्ष्य सहज गाठले आणि भारतावर ४ विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने पाच सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. परंतु, हा सामना बाजूलाच राहिला. कारण चर्चा गुरुवारी महिला विश्वचषकात ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऐतिहासिक नाबाद शतक झळकावणाऱ्या जेमिमा रॉड्रिग्ज या नावाची होती.
30 ऑक्टोबर रोजी नवी मुंबई येथे महिला विश्वचषकाचा सेमीफायनल सामन्यात भारतीय महिला संघ आणि ऑस्ट्रेलिया महिला संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतीय महिलांसाठी ३३९ धावांचे लक्ष्य दिले होते. भारतीय महिला संघाने हे विक्रमी लक्ष्य गाठले आणि अंतिम सामन्यात धडक मारली. या विजयात जेमिमा रॉड्रिग्जने १३४ चेंडूत १२७ धावांची विजय मिळवून देणारी खेळी केली होती. त्यामुळे ती कौतुकाचा विषय ठरली आहे.
जेमिमाच्या या खेळीचा परिणाम सर्वत्र जाणवत आहे. जनतेपासून ते उच्चभ्रूंपर्यंत सर्वजण रॉड्रिग्जबद्दल बोलताना दिसत आहे. दरम्यान, सात वर्षांपूर्वी इंग्लंडचा माजी कर्णधार नासेर हुसेनचे एक ट्विट आता व्हायरल होत आहे. त्यांनी एक भविष्यवाणी केली होती. जी आता खरी ठरली आहे. चाहते या पोस्टबद्दल बोलू लागले आहेत.
इंग्लंडचा माजी कर्णधार नासेर हुसेनची ही पोस्ट २०१७ च्या भारत दौऱ्यातील आहे. यामध्ये, माजी कर्णधार नासेर हुसेन जेमिमासोबतचा एक फोटो त्याच्या भविष्यवाणीसह पोस्ट केलेला आहे. त्याने लिहिले आहे की, “हे नाव लक्षात ठेवा… जेमिमा रॉड्रिग्ज… आज जेमिमासोबत काही थ्रो-डाउन केले. ती भारतासाठी एक स्टार खेळाडू होणार आहे.”
It’s so humbling to see Nasser Hussain just in shorts throwing down on the streets. Didn’t respect him as much when he played, but seems like a genuinely nice human. And what a call this was 7 years ago. https://t.co/gxzeqfjVve — Vin United (@Iam_vin) October 31, 2025
हेही वाचा : IND W vs AUS W : ‘खेळ संपेपर्यंत संपलेला…’ गौतम गंभीरकडून महिला संघाचे अभिनंदन; आठवली १४ वर्ष जुनी…
जेमिमा बऱ्याच काळापासून टीम इंडियासाठी खेळत असून तिने आधीच आपले नाव कमावले आहे. परंतु, गुरुवारी झालेल्या सेमीफायनल सामन्यात १३४ चेंडूत नाबाद १२७ धावांची नाबाद खेळी करून जेमिमा केवळ स्टारच नाही तर भारतीय महिला क्रिकेटची सुपरस्टार खेळाडू बनली असल्याचे आता बोलले जात आहे. एकंदरीत, नासेर हुसेनने केलेली भविष्यवाणी पूर्णपणे खरी ठरल्याचे दिसत आहे.






