हैद्राबाद : भारतीय फलंदाज दिनेश कार्तिक (Dinesh Kartik) हा सध्या चांगलाच फॉर्मात असून तो संघासाठी चांगली कामगिरी करताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यामध्ये झालेल्या मालिकेत दिनेश कार्तिकने संघासाठी मोलाची कामगिरी केली. याच मालिके दरम्यान झालेल्या एका प्रकारामुळे दिनेश कार्तिक फार भडकला याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये एका मुलीच्या वर्तणूकीवर दिनेश कार्तिक संताप व्यक्त केला.
सामना संपल्यानंतर दिनेश कार्तिक हातात ट्रॉफी घेऊन फिरत होता. यादरम्यान एक मुलगी दिनेश कार्तिकच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करताना दिसली. व्हिडिओ पाहिल्यावर समजत की, मुलगी दिनेश कार्तिकच्या जवळ येण्याचा प्रयत्न करते पण, डीके त्या मुलीला दूर राहण्यास सांगतो. सामना संपल्यानंतर सर्व खेळाडू मैदानावर एकमेकांना भेटत असताना एक मुलगी डीकेच्या हाताला स्पर्श करताना दिसतेय. दिनेशला मुलीने केलेला स्पर्श आवडला नाही आणि तो तिच्यावर संतापला. कार्तिकच्या प्रतिक्रियेवरून त्याला मुलीने केलेल्या स्पर्शाचा खूप राग आल्याचं दिसतंय. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे पाहता येतंय की, मुलीने स्पर्श केल्यानंतर ती डीकेची माफी मागताना दिसतेय.
DK And Girls , A Never Ending Story For sure ?@DineshKarthik @DK_Popa_#dk #dineshkarthik #dineshkartik #dkpopa #dk_popa_ka_jalwa_gajar_ka_halwa#INDvsAUS #IndianCricketTeam pic.twitter.com/Plf4BGMo7x
— Heat Man (@HeatMan86428090) September 26, 2022
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या T २० मालिकेत भारतीय टीमचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकला तिन्ही सामन्यांमध्ये खेळण्याची संधी देण्यात आली. अशा परिस्थितीत डीकेने ऑस्ट्रेलियाविरुद्ध विरुद्ध ३ सामन्यात २१२. ५० च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी केली आहे.