Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 20 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Duleep Trophy: BCCI ने दलिप ट्रॉफी फायनलची जागा बदलली, आता बंगळुरू नाही तर ‘इथे’ रंगणार सामना

Duleep Trophy: भारतीय देशांतर्गत हंगामाची सुरुवात २३ ऑगस्ट रोजी होणाऱ्या दुलीप ट्रॉफीने होईल. बीसीसीआयने या स्पर्धेचे वेळापत्रक आधीच जाहीर केले असून, आता अंतिम सामना चेन्नईत निश्चित झाला आहे.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Aug 20, 2026 | 10:09 AM
दलीप ट्रॉफीचा अंतिम सामना नक्की कुठे (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

दलीप ट्रॉफीचा अंतिम सामना नक्की कुठे (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • दलीप ट्रॉफीचा अंतिम सामना आता बंगळुरूत होणार नाही 
  • बीसीसीआयने वृत्ताला दिला दुजोरा
  • आता चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला जाणार अंतिम सामना 
Duleep Trophy: भारतीय क्रिकेट टीम सध्या श्रीलंकेत झेंडे रोवत आहे तर २०२६-२७ चा भारतीय देशांतर्गत क्रिकेट हंगाम २३ ऑगस्ट रोजी सुरू होणाऱ्या दुलीप ट्रॉफीने सुरू होईल, तर अंतिम सामना ६ सप्टेंबर रोजी होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून दलीप ट्रॉफीबाबत सगळीकडेच चर्चा आहे. दरम्यान बीसीसीआयने यापूर्वी वेळापत्रक जाहीर केले होते, ज्यानुसार अंतिम सामन्यासह सर्व सामने बंगळूरु येथील सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये होणार होते. 

मात्र चाहत्यांना सामन्याचा आनंद घेता यावा यासाठी, बीसीसीआयने आता अंतिम सामन्याच्या स्थळात बदल करून तो चेन्नई येथील एम. ए. चिदंबरम स्टेडियममध्ये हलवला आहे. दोन्ही उपांत्यपूर्व फेरीचे सामने २३ ऑगस्ट रोजी सुरू होतील, ज्यात पहिला सामना पूर्व विभाग विरुद्ध ईशान्य विभाग, तर दुसरा सामना उत्तर आणि पश्चिम विभागाच्या संघांमध्ये होईल.

Duleep Trophy 2026: नॉर्थ झोन संघ जाहीर; Arshdeep Singh- Anshul Kamboj ला संघात स्थान, जम्मू-काश्मीरच्या खेळाडूकडे कर्णधारपद

दलीप ट्रॉफीचे सर्व सामने थेट प्रक्षेपित

PTI या वृत्तसंस्थेनुसार, दलीप ट्रॉफीच्या अंतिम सामन्याच्या स्थळातील बदलाची घोषणा करताना BCCI चे सचिव देवजित सैकिया यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये प्रेक्षकांच्या संख्येवर काही मर्यादा असल्याने अंतिम सामना चेन्नईमध्ये आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दलीप ट्रॉफी ही आपल्या देशांतर्गत कॅलेंडरमधील एक प्रमुख प्रथम-श्रेणी स्पर्धा आहे आणि याच कारणास्तव, चाहत्यांना स्टेडियममध्ये अंतिम सामना पाहण्याची संधी मिळावी अशी आमची इच्छा आहे. दुलीप ट्रॉफीचे सर्व सामने थेट प्रक्षेपित केले जातील, तर एक उपांत्यपूर्व फेरीचा, एक उपांत्य फेरीचा आणि अंतिम सामना टीव्हीवर थेट प्रसारित केला जाईल.

सर्वांच्या नजरा वैभव सूर्यवंशीच्या खेळावर 

यावेळी दलीप ट्रॉफी १५ वर्षीय सलामीवीर फलंदाज वैभव सूर्यवंशीवर केंद्रित असेल, ज्याचा पूर्व विभागाच्या संघात समावेश करण्यात आला आहे आणि त्याला उपकर्णधारपदाची जबाबदारीही देण्यात आली आहे. ईशान किशन या संघाचे कर्णधारपद भूषणवणार आहे. मात्र वैभवने लाल चेंडूने नियमित सराव करत स्पर्धेची तयारी आधीच सुरू केली आहे. 

इतर मोठ्या खेळाडूंमध्ये ऋतुराज गायकवाड, तिलक वर्मा, रिंकू सिंग आणि अर्शदीप सिंग यांच्यावर बारकाईने लक्ष असेल. ऋतुराज गायकवाड पश्चिम विभागाच्या संघाचे, तर तिलक वर्मा दक्षिण विभागाच्या संघाचे कर्णधारपद भूषवतील. दरम्यान, सलग दोन आयपीएल हंगामात आरसीबीला विजय मिळवून देणारा रजत पाटीदार सेंट्रल झोन संघाचे कर्णधारपद भूषवत आहे. यावेळी दलीप ट्रॉफी नक्की कोण गाजवणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. 

Duleep Trophy 2026: विजेतेपद राखण्याचे आव्हान! रजत पाटीदारच्या नेतृत्वात ‘सेंट्रल झोन’ पुन्हा मैदानात उतरणार

Web Title: Duleep trophy final shifted from bengaluru to chennai bcci confirmed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 20, 2026 | 10:09 AM

Topics:  

  • chennai
  • Duleep Trophy
  • duleep trophy 2026

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.