दुलीप ट्रॉफी २०२६-२७ साठीच्या (Duleep Trophy 2026) उत्तर विभागाचा संघ जाहीर करण्यात आला आहे. निवड समितीने १५ सदस्यीय संघाची निवड केली आहे. भारतीय वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगचाही उत्तर विभागाच्या संघात समावेश करण्यात आला आहे. या हंगामात कन्हैया वाधवानकडे कर्णधारपदाची कमान सोपवण्यात आली आहे. तर, दिल्लीच्या यश धुलची उपकर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अष्टपैलू खेळाडू आयुष बडोनीलाही उत्तर विभागाच्या संघात स्थान मिळाले आहे. या स्पर्धेत उत्तर विभागाचा सलामीचा सामना ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील पश्चिम विभागाशी होईल. २३ ऑगस्टपासून दुलीप ट्रॉफी २०२६ ला सुरूवात होणार आहे.
भारताचा अपूर्ण नकाशा दाखवणे पडले महागात; लव्हलिनाच्या आक्षेपानंतर ग्लासगोतील रेस्टॉरंटचा यू-टर्न
भारतीय वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग आणि अंशुल कंबोज यांचाही उत्तर विभागीय संघात समावेश केला आहे. अर्शदीप २०२५ च्या इंग्लंड दौऱ्यात भारताच्या कसोटी संघाचा भाग होता, पण त्याला अद्याप कसोटी पदार्पण करण्याची संधी मिळाली नाही. राष्ट्रीय कसोटी संघातून वगळण्यात आल्यानंतर अंशुल कंबोजदेखील या स्पर्धेच्या माध्यमातून पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात असेल. दिल्लीचा युवा फलंदाज आयुष बडोनीला संघाचा उपकर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे हा संघ मजबूत दिसत आहे.
गेल्या हंगामात रणजी ट्रॉफी जिंकलेल्या जम्मू आणि काश्मीर संघाचे उत्तर विभागीय संघात वर्चस्व दिसत आहे. रणजी विजेत्या संघातील सहा खेळाडूंचा दुलीप ट्रॉफी संघात समावेश करण्यात आला आहे. कर्णधार वधावन व्यतिरिक्त, सलामीवीर कामरान इक्बाल, मधल्या फळीतील फलंदाज अब्दुल समद, डावखुरा फिरकी अष्टपैलू आबिद मुश्ताक आणि वेगवान गोलंदाज सुनील कुमार व युधवीर सिंग यांचाही संघात समावेश आहे.
अनुभवी फलंदाज पारस डोगराला यावेळी संघात स्थान देण्यात आले नाही. निवड समितीने तरुण खेळाडूंवर विश्वास व्यक्त केला आहे. वेगवान गोलंदाज आकिब नबीला दुखापतग्रस्त जसप्रीत बुमराहच्या जागी भारताच्या श्रीलंका दौऱ्याच्या संघात समावेश करण्यात आला आहे. इंडिया ‘अ’ संघाचे नियमित सदस्य निशांत सिंधू, अर्जुन शर्मा आणि आबिद मुश्ताक यांच्यामुळे फिरकी आणि अष्टपैलू विभागाला फायदा होईल.
कन्हैया वाधवन (कर्णधार), आयुष बडोनी (उपकर्णधार), सनत सांगवान, कामरान इक्बाल, यश धुल, आयुष डोसेजा, अब्दुल समद, निशांत सिंधू, अर्जुन शर्मा, आबिद मुश्ताक, अर्शदीप सिंग, सुनील कुमार, अंशुल कंबोज, युद्धवीर सिंग आणि निखिल कश्यप.
दिल्ली न्यायालयाचा मोठा निर्णय; लैंगिक छळ प्रकरणात बृजभूषण सिंग निर्दोष, विनेश फोगट संतप्त, म्हणाली…






