फोटो सौजन्य - Cricbuzz सोशल मीडिया
चॅम्पियन ट्रॉफीच्या चौथ्या सामन्याला सुरुवात झाली आहे. यामध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये सामना सुरु झाला आहे. ग्रुप बी मधील आजचा हा दुसरा सामना आहे. पहिल्या सामन्यांमध्ये अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये लढत पाहायला मिळाली. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने विजय मिळवला. आज ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. २०२५ चा चौथा सामना लाहोरच्या गद्दाफी स्टेडियम मैदानावर खेळला जात आहे. जोस बटलरच्या नेतृत्वात इंग्लंडचा संघ खेळत आहे.
मिस्ट्री गर्लला इंस्टाग्रामवरही फॉलो करतो शिखर धवन! कोण आहे ही मुलगी? सोशल मीडियावर Photo Viral
ऑस्ट्रेलियाच्या संघामधून अनेक खेळाडूंनी चॅम्पियन ट्रॉफीच्या स्पर्धेमधून दुखापतीमुळे आणि वैयत्तिक कारणांमुळे माघार घेतली आहे. पण ऑस्ट्रेलियाच्या संघामध्ये ट्रॅव्हिस हेड, अॅलेक्स केरी, ग्लेन मॅक्सवेल, बेन द्वारशुइस आणि कॅप्टन स्टीव्ह स्मिथ सारखे दमदार खेळाडू संघामध्ये आहेत. इंग्लंडचा संघ चॅम्पियन ट्रॉफीआधी भारत दौऱ्यावर होता. यामध्ये इंग्लंडची तीन सामान्यांची एकदिवसीय मालिका झाली पण ते फार काही चांगली कामगिरी करू शकले नाही. भारताच्या संघाने इंग्लंडला ३-० ने पराभूत केले आहे. त्यामुळे आज ऑस्ट्रेलिया विरुद्ध सुरु असलेल्या सामन्यांमध्ये इंग्लंडचा संघ कशाप्रकारे कामगिरी करेल हे पाहणं मनोरंजक ठरेल.
हा लेख लिहिपर्यत ऑस्ट्रेलियाने दुसऱ्याच षटकात इंग्लंडला मोठा धक्का दिला आहे. सॉल्टने द्वारशुइसच्या चेंडूवर एरियल शॉट मारला पण मिड-ऑफवर असलेल्या अॅलेक्स कॅरीने एका हाताने जबरदस्त झेल घेत त्याचा डाव संपवला. ऑस्ट्रेलियाने सलामीवीर फिल साल्टला बाद करून इंग्लंडची सुरुवात खराब केली.
Australia have won the toss and put us into bat 🇦🇺
🏴 COME ON ENGLAND! 🏴
Follow along live via our Match Centre, right here 👇
— England Cricket (@englandcricket) February 22, 2025
इंग्लंडकडे जोफ्रा आर्चर, मार्क वूड आणि ब्रायडन कार्से यांच्या रूपात त्रिकोणी वेगवान गोलंदाजीचा हल्ला आहे तर आदिल रशीद फिरकी गोलंदाजीची धुरा सांभाळेल. फलंदाजांना अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर, बेन डकेटकडून चांगली कामगिरी अपेक्षित आहे कारण तो भारताविरुद्ध उत्तम फॉर्ममध्ये होता. जो रूट हा इंग्लंडच्या फलंदाजीचा कणा आहे आणि तो पुन्हा एकदा त्याची उपयुक्तता सिद्ध करू इच्छितो.
ट्रॅव्हिस हेड, मॅथ्यू शॉर्ट, स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), मार्नस लाबुशेन, जोश इंगलिस (विकेटकिपर), अॅलेक्स केरी, ग्लेन मॅक्सवेल, बेन द्वारशुइस, नॅथन एलिस, अॅडम झांपा, स्पेन्सर जॉन्सन
फिलिप साल्ट, बेन डकेट, जेमी स्मिथ (विकेटकिपर), जो रूट, हॅरी ब्रूक, जोस बटलर (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, मार्क वूड.