फोटो सौजन्य - JioHotstar सोशल मीडिया
शिखर धवन मिस्ट्री गर्लसोबत : भारताचा माजी सलामीवीर फलंदाज शिखर धवन भारत विरुद्ध बांग्लादेश सामन्यांमध्ये आला होता. यावेळी तो त्याच्या खास जुन्या खेळाडूंना भेटला याचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्याचबरोबर तो कॉमेंट्री बॉक्समध्ये सुद्धा मजा मस्ती करताना पाहायला मिळाला. माजी भारतीय सलामीवीर शिखर धवन त्याची माजी पत्नी आयशा मुखर्जी यांचा २०२३ मध्ये घटस्फोट झाला होता. बांग्लादेशविरुद्ध सामन्यांमध्ये शिखर धवनचे काही पाहतो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर एका मिस्ट्री गर्लसोबत पाहायला मिळाले आहेत. सध्या हे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखे व्हायरल होत आहेत.
बांगलादेशमधील सामन्यादरम्यान, तो कोणासोबत तरी दिसला, त्यानंतर अशी अफवा पसरली की ती त्याची कथित प्रेयसी आहे. शिखरच्या शेजारी बसलेल्या मुलीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. दोघांचेही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. चला, आपण एक नजर टाकू आणि कोण आहे ती मिस्त्री मिस्ट्री गर्ल?
IND vs PAK : पाकिस्तानविरुद्ध या भारतीय फलंदाजांच्या नावावर सर्वाधिक धावा, पाक संघाच्या अडचणी वाढणार
शिखर धवन ज्या मुलीसोबत दिसत आहे तिचे नाव सोफी शाइन असल्याचे सांगितले जात आहे. दोघेही एकमेकांच्या खूप जवळ असल्याचे दिसून आले आणि ते कॅमेऱ्यात कैद होत आहेत हे लक्षात येताच ते दोघेही टाळताना दिसले. तथापि, कॅमेरापासून वाचवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करूनही, तो पकडला गेला आणि त्याचा फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
During Thursday’s India vs Bangladesh match, former Indian opener Shikhar Dhawan was spotted with a stunning foreign woman, sparking curiosity about her identity. Social media sleuths quickly identified her as Sophie Shine, a beautiful Irish woman who works as a product… pic.twitter.com/tyiVIA1oBr
— Amy Star (@amystar97) February 22, 2025
सोफी शाइन अलीकडेच शिखर धवनसोबत दिसली होती, त्यानंतर ती सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. सोफीच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, ती आयर्लंडमध्ये राहते आणि तिथे उत्पादन सल्लागार म्हणून काम करते. तथापि, ती प्रसिद्धीझोतात येणे टाळते, त्यामुळे तिच्याबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही.
शिखर आणि सोफीची नावे एकमेकांशी जोडली जात आहेत. यामागील कारण म्हणजे शिखर सोफीला इंस्टाग्रामवर फॉलो करतो. यामुळे त्या दोघांच्या अफेअरच्या बातम्यांना वेग येत आहे. तथापि, दोघांपैकी कोणीही त्यांच्या नात्याची पुष्टी केलेली नाही. पण आतापर्यंत कोणीही या नात्याची पुष्टी केलेली नाही.
शिखर धवनचा आयेशा मुखर्जीशी घटस्फोट २०२३ मध्ये आयेशा मुखर्जीशी घटस्फोट झाल्यापासून धवन अविवाहित आहे आणि अलीकडेच त्याने दोन वर्षांपासून आपल्या मुलाला पाहिले नसल्याचे उघड केले. ऑक्टोबर २०२३ मध्ये दिल्लीच्या एका न्यायालयाने धवनचा घटस्फोट अंतिम केला, ज्यामध्ये त्याच्या माजी पत्नीने दिलेला ‘क्रूरता’ आणि ‘मानसिक त्रास’ हे वेगळे होण्याचे कारण असल्याचे नमूद केले.