
फोटो सौजन्य - England Cricket सोशल मिडिया
Australia vs England 4th Test : अॅशेस मालिकेचा चौथा सामना सध्या खेळवला जात आहे. या सामन्याच्या दुसऱ्याच दिवशी सामना संपेल अशी परिस्थिती आहे. इंग्लडने पहिल्या तीन सामन्यामध्ये केलेल्या निराशाजनक कामगिरीनंतर आता चौथ्या सामन्यामध्ये त्याची प्रभावी कामगिरी पाहायला मिळाली आहे. इंग्लडने कमालीची कामगिरी चौथ्या सामन्यामध्ये केली आहे. सामन्याचा दुसरा दिवस असताना आता इंग्लडला ऑस्ट्रेलियाच्या संघाने फार कमी धावांचे लक्ष दिले आहे. पहिल्या तीन सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघाचा दबदबा पाहायला मिळाला आता चौथ्या सामन्यामध्ये इंग्लडच्या कामगिरीवर चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
अॅशेस मालिकेतील चौथ्या सामन्यात ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने इंग्लंडला विजयासाठी १७५ धावांचे लक्ष्य दिले आहे. शनिवारी दुसऱ्या डावात सर्व विकेट गमावल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ ३४.३ षटकांत केवळ १३२ धावा करू शकला. दुसऱ्या डावातही ऑस्ट्रेलियाचे फलंदाज अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकले नाहीत. स्टीव्ह स्मिथ आणि ट्रॅव्हिस हेड वगळता कोणताही फलंदाज २० धावांचा टप्पा ओलांडू शकला नाही. शुक्रवारी सामन्याच्या पहिल्या दिवशी यजमान संघ ४६ षटकांत १५२ धावांवर ऑलआउट झाला, त्यानंतर इंग्लंड एक पाऊल पुढे गेले आणि ३० षटकांपेक्षा कमी वेळात फक्त ११० धावांवर ऑलआउट झाला.
मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळल्या जाणाऱ्या चौथ्या सामन्यात, दुसऱ्या दिवशी ४ धावांच्या धावसंख्येपासून पुढे खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियाला सर्व विकेट्स गमावल्यानंतर फक्त १३२ धावा करता आल्या. ‘बॉक्सिंग डे’ कसोटीसाठी विक्रमी ९४१९९ प्रेक्षक मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर पोहोचले होते. तथापि, पहिल्या दिवशी चाहत्यांना फक्त विकेट्स पडताना दिसल्या. दुसऱ्या दिवशीही अशीच परिस्थिती होती. दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का स्कॉट बोलँडच्या रूपात बसला. तो सातव्या षटकात गस एटकिन्सनचा बळी ठरला. त्याने १७ चेंडूत ६ धावा केल्या. सलामीवीर जॅक वेदरल्ड १५ चेंडूत फक्त ५ धावा करू शकला. स्टार फलंदाज मार्नस लाबुशेनने १८ चेंडूत ८ धावांचे योगदान दिले.
Ben Stokes gets the final wicket and our target is set… 1️⃣7️⃣5️⃣ to win. COME ON BOYS! 🏴 pic.twitter.com/jQZrJu5ENS — England Cricket (@englandcricket) December 27, 2025
सलामीवीर ट्रॅव्हिस हेड ६७ चेंडूत ४६ धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतला. या डावात तो सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. उस्मान ख्वाजा आपले खातेही उघडू शकला नाही. अॅलेक्स कॅरीने ६ चेंडूत ४ धावा आणि कॅमेरॉन ग्रीनने २९ चेंडूत १९ धावा केल्या. स्टार्क आपले खातेही उघडू शकला नाही, तर स्टोक्सने जे रिचर्डसनला ७ धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर बाद करून ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव संपवला. इंग्लंडकडून ब्रायडन कॉर्सने सर्वाधिक ४ बळी घेतले. बेन स्टोक्सने ३ आणि जोश टंगने २ बळी घेतले. गस अॅटकिन्सनने एका फलंदाजाला बाद केले.