फोटो सौजन्य – JioHotstar
भारत विरुद्ध इंग्लड यांच्यामध्ये पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्याचा काल दुसरा दिवस पार पडला आहे. इंग्लडच्या संघाने नाणेफेक जिंकुन पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या सामन्यात भारताच्या संघाने पहिले फलंदाजी करत 471 धावा केल्या आहेत. कालपासुन दुसऱ्या डावाला सुरुवात झाली आहे, यामध्ये दुसऱ्या दिनाच्या समाप्तीनंतर इंग्लडच्या संघाने 3 विकेट्स गमावुन 209 धावा केल्या आहेत. इंग्लडच्या संघाने पहिल्या दिनी फारच निराशाजनक कामगिरी केली होती. लीड्स कसोटीच्या दुसऱ्या दिवशी, टीम इंडियाकडून जसप्रीत बुमराहने अद्भुत गोलंदाजी सादर केली.
जसप्रीत व्यतिरिक्त, दुसऱ्या दिवशी कोणताही भारतीय गोलंदाज विकेट घेऊ शकला नाही. दुसऱ्या दिवशी बुमराहला 4 विकेट मिळू शकल्या असत्या पण त्याच्या नो बॉलमुळे हे होऊ शकले नाही. त्याच वेळी, बुमराह पुन्हा एकदा कसोटी क्रिकेटमध्ये 13 हजारांहून अधिक धावा आणि ३६ शतके करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटपटूचा किलर बनला. होय, आम्ही जो रूटबद्दल बोलत आहोत, ज्याला बुमराहने लवकरच पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.
कसोटी क्रिकेटमध्ये जो रूटला बाद करण्यासाठी जगातील सर्वोत्तम गोलंदाज घाम गाळतात, पण जसप्रीत बुमराहसमोर रूटची बॅट शांत होते. दुसऱ्या दिवशी 28 धावा काढल्यानंतर जो रूट बुमराहचा बळी ठरला. बुमराहने कसोटी क्रिकेटमध्ये 10 व्यांदा रूटला बाद केले आहे आणि कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा रूटला बाद करणारा तो दुसरा वेगवान गोलंदाज बनला आहे. या यादीत पहिले नाव ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सचे आहे, ज्याने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा म्हणजे 11 वेळा जो रूटला बाद केले आहे.
Jasprit Bumrah vs Joe Root – All 13 Wickets
Someone add today’s dismissal to this pic.twitter.com/31oxIkxc3t— Cric Gold (@CricsGoldy) June 21, 2025
भारताचा पहिला डाव दुसऱ्या दिवशी 471 धावांवर संपला. टीम इंडियाकडून तिसरे शतक ऋषभ पंतच्या फलंदाजीने झाले. पंतने 134 धावांची खेळी केली. दुसऱ्या दिवसाच्या खेळाअखेर इंग्लंडने 3 विकेट गमावून 209 धावा केल्या होत्या. इंग्लंडकडून उपकर्णधार ऑली पोपने शानदार शतक झळकावले. सध्या पोप 100 धावांवर नाबाद आहे आणि हॅरी ब्रुक खाते न उघडता नाबाद आहे. यापूर्वी, जॅक क्रॉली 4 धावा, बेन डकेट 62 धावा आणि जो रूट 28 धावा अशा तीन पराभवांना इंग्लंडने तोंड दिले.