फोटो सौजन्य : BCCI
ऋषभ पंत : भारत विरुद्ध इंग्लड यांच्यामध्ये 20 जूनपासुन 5 सामन्यांची कसोटी मालिका सुरु होणार आहे. भारताचा संघ हा शुभमन गिलच्या नेतृत्वात मैदानात उतरणार आहे. शुभमन गिल याला भारताचा 37 वा कर्णधार बनवण्यात आले आहे. भारताचा संघ हा इंग्लडला पोहोचला आहे, प्रॅक्टिस स्टेशनच्या वेळी भारताचा उपकर्णधार रिषभ पंत हा जखमी झाला आहे. सध्या भारतीय संघ हा प्रॅक्टिस करत आहे यासंदर्भात आता मोठी अपडेट समोर आली आहे.
आयपीएल 2025 च्या शेवटच्या सामन्यामध्ये ऋषभ पंत आणि शतक झळकावले होते पण संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. इंग्लंड दौऱ्यासाठी भारताचा उपकर्णधार पद हे ऋषभ पंत देण्यात आले आहे. सराव सत्रादरम्यान यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंतच्या हाताला दुखापत झाली, ज्यामुळे भारतीय चाहत्यांचा ताण वाढला आहे.
Australia vs South Africa : पॅट कमिन्स मोडणार बुमराहचा रेकाॅर्ड? WTC Final ठरेल ऐतिहासिक
आगामी दौऱ्यासाठी ऋषभ पंतवर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्याला संघाचा उपकर्णधार म्हणून निवडण्यात आले आहे. दुखापतीतून परतल्यानंतर ऋषभ पंत पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये अपेक्षेनुसार कामगिरी करू शकला नाही. परंतु त्याने कसोटी क्रिकेटमध्ये स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
20 जूनपासून लीड्समध्ये सुरू होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेपूर्वी भारतीय क्रिकेट संघाने रविवारी लॉर्ड्सवर सराव करून दौऱ्याची सुरुवात केली. यादरम्यान, सराव करताना ऋषभ पंतला दुखापत झाली. सराव सत्रादरम्यान यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतला डाव्या हाताला दुखापत झाली. तथापि, रेव्हस्पोर्ट्सच्या वृत्तानुसार, पंतची दुखापत गंभीर नव्हती, ज्याची पुष्टी पंत आणि संघाच्या डॉक्टरांनी केली. त्यामुळे तो मालिकेदरम्यान भारतासाठी खेळताना दिसणार आहे.
Rishabh Pant stuck on his left arm and is seething in pain on Day 1 of Team India’s camp in Beckenham
📸 @rohitjuglan pic.twitter.com/9mzcLyavp8
— RevSportz Global (@RevSportzGlobal) June 8, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये पहिला सामना हा 20 जून ते 24 जून या दरम्यान खेळवला जाणार आहे. तर दुसरा सामना हा दोन जुलै ते सहा जुलै या आयोजित करण्यात आला आहे. लॉर्ड्स येथे तिसरा सामना खेळवला जाणार आहे हा सामना 10 जुलै ते 14 जुलै या वेळेत होणार आहे. इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या मालिकेतील चौथा सामना हा 23 जुलै ते 27 जुलै या कालावधीत खेळणार आहे. इंग्लंड विरुद्ध शेवटचा भारतीय संघाचा सामना हा चार ते आठ ऑगस्ट या वेळेत खेळवला जाणार आहे.