फोटो सौजन्य : X
जगातील सर्वात मोठी स्पर्धा सुरु व्हायला काही दिवस शिल्लक राहिले आहेत. ही स्पर्धा ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका या दोन संघामध्ये खेळवली जाणार आहे. ऑस्ट्रेलियन संघ हा पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसणार आहेत तर दक्षिण आफ्रिकेचा संघ हा बावुमाच्या कॅप्टन्सीमध्ये खेळेल. 2023 मध्ये पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाच्या संघाला चॅम्पियन बनवले होते यावेळीही तो अशाच इराद्याच मैदानात उतरेल. कमिन्सला या अंतिम सामन्यात दोन मोठे विक्रम करण्याची सुवर्णसंधी असणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघाने पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली कमालीची कामगिरी मागील काही वर्षामध्ये केली आहे.
वास्तविक, पॅट कमिन्सने आतापर्यंत ऑस्ट्रेलियासाठी एकूण ६७ कसोटी सामने खेळले आहेत. या त्याच्या कारकीर्दीमध्ये त्याने २९४ विकेट्स नावावर केल्या आहेत. जर कमिन्स आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात ५ विकेट्स घेण्यास यशस्वी झाला, तर तो कसोटीत ३०० विकेट्स पूर्ण करेल. कमिन्स हा विक्रम करणारा ऑस्ट्रेलियाचा सहावा वेगवान गोलंदाज ठरु शकतो. लॉर्ड्सच्या मैदानावर कमिन्स दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांसाठी मोठा धोका ठरू शकतो. आतापर्यत पॅट कमिन्सने इंग्लंडच्या मैदानांवर ११ सामन्यांमध्ये ५१ विकेट्स नावावर केल्या आहेत.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या या सायकलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम जसप्रीत बुमराहच्या नावावर आहे. बुमराहने १५ सामन्यांमध्ये एकूण ७७ विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर कमिन्स या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. कांगारू कर्णधाराने आतापर्यंत १७ सामन्यांमध्ये ७३ विकेट्स घेतल्या आहेत. म्हणजेच, जर कमिन्सने डब्ल्यूटीसी फायनलमध्ये ५ विकेट्स घेण्यात यश मिळवले तर तो डब्ल्यूटीसीच्या या सायकलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज बनेल. मिशेल स्टार्क ७२ विकेट्ससह या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना ११ जूनपासून खेळला जाणार आहे.
Taiwan Athletics Open 2025 मध्ये भारतीय खेळाडूंचा दबदबा! पहिल्याच दिनी सहा सुवर्ण
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचा सामना हा 11 जून ते 15 जून यादरम्यान खेळवला जाणार आहे. हा सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये रंगणार आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका या सामन्यात कोण जिंकणार आणि कोणाच्या नावावर जेतेपद होणार हे पाहणे महत्वाचे ठरेल. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या गुणतालिकेमध्ये जो संघ पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर असतो तो संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमचा सामना खेळतात. भारताचा संघ गुणतालिकेमध्ये तिसऱ्या स्थानावर राहिला.