फोटो सौजन्य : BCCI
भारत विरुद्ध इंग्लड सामन्याची लाइव्ह स्ट्रिमिंग : भारत विरुद्ध इंग्लड यांच्यामध्ये सामन्याला काही तासात सुरुवात होणार आहे. भारतीय संघासाठी हा सामना त्याचबरोबर ही मालिका देखील फार महत्वाची असणार आहे. भारताच्या संघामधून रोहीत शर्मा, विराट कोहली त्याचबरोबर आर अश्विन यांनी क्रिकेटमधुन निवृतीची घोषणा घेतली आहे. भारतीय संघासाठी तीन दिग्गज खेळाडू हे भारतीय संघामधुन निवृत होणं हा फारच मोठा लाॅस आहे. भारताच्या संघात आता या तीन खेळाडूंची जागा कोण घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणा आहे.
भारत विरुद्ध इंग्लड मालिका सुरु होणार आहे, रोहितच्या निवृतीनंतर भारताच्या संघाचे कर्णधारपद हे शुभमन गिल सांभाळणार आहे. तसेच, ऋषभ पंतला उपकर्णधार बनवण्यात आले आहे. 2007 पासून भारतीय संघाने इंग्लंडमध्ये एकही कसोटी मालिका जिंकलेली नाही. अशा परिस्थितीत गिलकडे इतिहास रचण्याची संधी आहे. कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना कधी आणि कुठे खेळला जाईल ते आम्हाला कळवा. चाहते टीव्ही आणि मोबाईलवर हा सामना कसा पाहू शकतात.
WTC पराभवानंतर कांगारुच्या संघामध्ये दोन मोठे बदल! या दोन खेळाडूंची झाली एंन्ट्री
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये होणाऱ्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला शुभारंभ हा आज पासून म्हणजेच 20 जून 2025 पासून होणार आहे. या मालिकेचा पहिला सामना हा लिड्समधील हेडिंगले स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. परत विरुद्ध इंग्लंड यांच्यामधील पहिला कसोटी सामना हा भारतीय वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता सुरू होणार आहे. या सामन्याचे नाणेफेक हे तीन वाजता होणार आहे.
भारतीय प्रेक्षकांसाठी भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामधील होणारा पहिला कसोटी सामन्याची थेट प्रक्षेपण हे टेलिव्हिजनवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर तुम्हाला पाहता येणार आहे. तर मोबाईलवर पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी तुम्ही जिओहॉटस्टार वर या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहू शकता.
Abki baar saare hisaab barabar honge! 🔥
Team India are ready! Kasam Paida Karne Wale Ki… iss baar “Ground Unka hoga, par jeet hamari!” 💪🇮🇳
Dekhiye India’s Tour of England, kal se Sony Sports Network ke TV Channels par!#SonySportsNetwork #GroundTumharaJeetHamari #ENGvIND… pic.twitter.com/oXNUIfQwyt
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) June 19, 2025
शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार आणि विकेटकिपर), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन, करुण नायर, नितीश रेड्डी, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (विकेटकिपर), वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकुर, मोहम्मद कुमार, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, हर्षित राणा.
हॅरी ब्रुक, झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जेमी स्मिथ, बेन स्टोक्स (कर्णधार), जेकब बेथेल, ब्रायडन कार्स, जेमी ओव्हरटन, ख्रिस वोक्स, सॅम कुक, शोएब बशीर, जोश टंग.