फोटो सौजन्य - X
ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडीज : ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल सामना पार पडला या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाची निराशा जनक फलंदाजीमुळे त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. पहिल्या डावामध्ये स्टीव्ह स्मिथ आणि दुसऱ्या डावामध्ये मिचेल स्टार्क या दोघांनी चांगली कामगिरी केली होती. त्यानंतर एकही फलंदाज चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरला. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल मध्ये पराभव झाल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघ पुढील मालिकाही वेस्टइंडीज विरुद्ध खेळणार आहे यासंदर्भात आता मोठी अपडेट समोर आली आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडीज यांच्यामध्ये मालिका सुरू होण्याआधी दोन खेळाडूंना बाहेरच रस्ता दाखवण्यात आला आहे. त्यानंतर, आता वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी संघात २ मोठे बदल दिसून आले आहेत. स्टीव्ह स्मिथने WTC फायनलमध्ये चांगली फलंदाजी केली, पहिल्या डावात त्याच्या बॅटमधून अर्धशतक झळकले. त्याच वेळी, क्षेत्ररक्षण करताना त्याच्या बोटाला दुखापत झाली, ज्यामुळे स्मिथला मैदान सोडावे लागले. त्यानंतर, आता वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी संघात २ मोठे बदल दिसून आले आहेत.
स्टीव्ह स्मिथने WTC फायनलमध्ये चांगली फलंदाजी केली, पहिल्या डावात त्याच्या बॅटमधून अर्धशतक झळकले. त्याच वेळी, क्षेत्ररक्षण करताना त्याच्या बोटाला दुखापत झाली, ज्यामुळे स्मिथला मैदान सोडावे लागले. त्यानंतर, तो क्षेत्ररक्षण करतानाही दिसला नाही. आता स्मिथ वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यातून बाहेर पडणार आहे. दुसरीकडे, मार्नस लाबुशेन गेल्या काही काळापासून खराब फॉर्मशी झुंजत आहे, हा खेळाडू WTC फायनलमध्येही चांगली कामगिरी करू शकला नाही, ज्यामुळे मार्नसला संघातून वगळण्यात आले आहे. अंतिम सामन्याच्या पहिल्या डावात मार्नसने १७ धावा आणि दुसऱ्या डावात २२ धावा केल्या.
ENG vs IND : भारत जिंकणार! सचिन तेंडुलकर यांनी केली भविष्यवाणी, ऋषभ पंतवर केला कौतुकाचा वर्षाव
आता सॅम कॉन्स्टस आणि विकेटकीपर फलंदाज जोश इंगलिस यांना वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन संघात स्थान देण्यात आले आहे. आतापर्यंत या दोघांनीही प्रत्येकी २ कसोटी सामने खेळले आहेत. सॅम कॉन्स्टसने बॉर्डर गावस्कर ट्रॉफी दरम्यान भारताविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि त्याने त्याच्या पदार्पणाच्या सामन्यात अर्धशतकही झळकावले. या सामन्यात कॉन्स्टसने जसप्रीत बुमराहविरुद्ध भरपूर धावा केल्या. त्याच वेळी, जोश इंगलिसला श्रीलंकेविरुद्ध कसोटी पदार्पणाची संधी मिळाली. इंगलिसने त्याच्या पदार्पणाच्या सामन्यात शानदार शतक झळकावले. आता हे दोन्ही खेळाडू वेस्ट इंडिजविरुद्ध धमाकेदार कामगिरी करण्यास सज्ज आहेत.