Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ENG vs ITAT, T20 World Cup 2026 :इंग्लंडसाठी धावून आला विल जॅक्स! इटलीसमोर उभारला 203 धावांचा डोंगर 

आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६ मध्ये आज २९ व्या सामन्यात इंग्लंड आणि इटली हे संघ आमनेसामने आले आहेत. कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर खेळवण्यात येत असलेल्या या सामन्यात इंग्लंडने इटलीसमोर २०३ धावांचे लक्ष्य दिले आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Feb 16, 2026 | 05:02 PM
ENG vs ITA: Will Jacks came running for England! He set a mountain of 203 runs against Italy.

ENG vs ITA: Will Jacks came running for England! He set a mountain of 203 runs against Italy.

Follow Us
Close
Follow Us:

ENG vs ITA, T20 World Cup 2026 : आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६ मध्ये आज २९ व्या सामन्यात इंग्लंड आणि इटली हे संघ आमनेसामने आले आहेत. कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर खेळवण्यात येत असलेल्या सामन्यात इंग्लंडने  प्रथम फलंदाजी करत विल जॅक्सच्या अर्धशतकाच्या जोरावर ७ गडी गमावून २०२ धावा केल्या आहेत. इटलीला विजय मिळवण्यासाठी २०३ धावा कराव्या लागणार आहेत. इटलीकडून क्रिशन कलुगामेजने २ विकेट्स घेतल्या आहेत.

हेही वाचा : IND vs PAK, T20 World Cup : ‘गलत जगह U-turn…’, दिल्ली पोलिसांनी उडवली पाकिस्तानची खिल्ली! पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल

कोलकाता येथील ईडन गार्डन्स स्टेडियमवर( आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६ )इंग्लंड संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडच्या डावाची सुरुवात चांगली झाली नाही. इंग्लंडला तिसऱ्याच षटकात २१ धावांवर पहिला झटका बसला. जोस बटलर ३ धावा करून माघारी गेला. त्यानंतर सलामीवीर फील साल्ट आणि जेकब बेथेल यांनी ३३ धावांची भागीदारी रचली, त्यानंतर फील साल्ट १५ चेंडूत २८ धावा करून बाद झाला. त्यानंतर जेकब बेथेल, टॉम बॅंटन यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. जेकब बेथेल २३ धवा करून बाद झाला तर टॉम बॅंटन ३० धावांवर माघारी गेला. कर्णधार हॅरी ब्रुक काही खास करू शकला नाही. तो १४ धावा करून बाद झाला. सॅम करनही २५ धावा करून माघारी गेला.त्यानंतर मात्र संघ चांगलाच अडचणीत आल्याचे दिसत असताना मैदानात आलेल्या विल जॅक्सने मात्र इटलीच्या गोलंदाजीवर चांगलेच आक्रमण चढवत इंग्लंडचा डाव पुढे नेला. जेमी ओव्हरटन १५ धावांवर बाद झाला, विल जॅक्सने आपले अर्धशतक पूर्ण करून संघाला देखील २०२ पर्यंत पोहचवले. तो २२ चेंडूत ५३ धावा काढून नाबाद राहिला. त्याने आपल्या खेळीत ३ चौकार आणि ४ षटकार लगावले. तसेच जोफ्रा आर्चर १ धाव काढून नाबाद राहिला. इटलीकडून ग्रँट स्टीवर्ट आणि क्रिशन कलुगामेज यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तर जेजे स्मट्स, अली हसन आणि  बेन मॅनेंटी यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

हेही वाचा :IND vs PAK : संघातून काढू टाका…सामना गमावल्यानंतर Shahid Afridi संतापला! टीममधून काढून टाकण्याची केली मागणी

दोन्ही संघ खालीलप्रमाणे

इंग्लंड प्लेइंग इलेव्हन : फिलिप साल्ट, जोस बटलर (w), जेकब बेथेल, टॉम बॅंटन, हॅरी ब्रुक (c), सॅम करन, विल जॅक्स, जेमी ओव्हरटन, लियाम डॉसन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद

इटली प्लेइंग इलेव्हन : जस्टिन मोस्का, अँथनी मोस्का, जेजे स्मट्स, हॅरी मॅनेंटी (c), बेन मॅनेंटी, मार्कस कॅम्पोपियानो, ग्रँट स्टीवर्ट, जियान मीड (w), जसप्रीत सिंग, क्रिशन कलुगामेज, अली हसन

 

Web Title: Eng vs ita t20 world cup 2026 england set a target of 203 runs for italy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 16, 2026 | 04:43 PM

Topics:  

  • Harry Brook
  • T20 World Cup 2026

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.