Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Eng vs NZ Test: इंग्लंडला मोठा फटका! आधी पराभव अन् आता ICC ने जखमेवर चोळले मीठ, नेमकं प्रकरण काय?

ICC Fined England team Cut 12 WTC Points after eng vs nz: न्यूझीलंड विरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात २५३ धावांनी ५३ धावांनी झालेल्या दारुण पराभवानंतर इंग्लंडला आणखी एक धक्का बसला आहे. आयसीसीने संघावर दंडात्मक कारवाी केली असून WTC मधील पॉईंट्स देखील कापले आहेत.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jun 22, 2026 | 02:18 PM
photo- social media

photo- social media

Follow Us
Follow Us:
  • इंग्लंडला मोठा फटका
  • न्यूझीलंडकडून दारुण पराभव
  • ICC ची कारवाई
ओव्हल येथे न्यूझीलंडविरुद्धच्या (Eng vs Nz) दुसऱ्या कसोटीत २५३ धावांनी झालेल्या दारुण पराभवानंतर इंग्लंडला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) स्लो ओव्हर रेट राखल्याबद्दल इंग्लंडचे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील (WTC) १२ गुण कमी केले आहेत. तसेच खेळाडूंना त्यांच्या सामना शुल्काच्या ५० टक्के दंडही ठोठावण्यात आला आहे. मना संपल्यानंतर लगेचच, आयसीसीने इंग्लंडला कठोर शिक्षा देण्याचा निर्णय अधिकृतपणे जाहीर केला.

IND vs AFG: भारताकडून पराभवानंतर अफगाणिस्तानला मोठा धक्का; ICC ची कर्णधार शाहिदीवर कारवाई

दंड का आकारण्यात आला?

आयसीसी एलिट पॅनेलचे सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांना असे आढळले की, निर्धारित वेळेत आणि उपलब्ध सवलती विचारात घेतल्यानंतरही इंग्लंडचे १२ ओव्हर मागे होती. आयसीसी आचारसंहितेच्या कलम २.२२ नुसार, एखादा संघ जितकी कमी ओव्हर टाकतो, तितका जास्त दंड आकारला जातो. या नियमांनुसार, कमी पडलेल्या प्रत्येक षटकासाठी खेळाडूंना त्यांच्या सामना शुल्काच्या ५ टक्के दंड आकारला जातो. कमाल दंड ५० टक्के असू शकतो. इंग्लंडचे १२ ओव्हर कमी पडल्यामुळे, संघाला त्यांच्या सामना शुल्काच्या कमाल ५० टक्के दंड आकारण्यात आला.

जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या(WTC) नियमांनुसार, प्रत्येक षटक टाकल्यावर संघाचा एक गुण कमी होतो. या आधारावर, इंग्लंडचे १२ डब्ल्यूटीसी गुण थेट वजा करण्यात आले. या फेरीत प्रत्येक गुण महत्त्वाचा मानला जात असल्याने, या शिक्षेमुळे इंग्लंडच्या डब्ल्यूटीसी अंतिम फेरीत पोहोचण्याच्या आशांना मोठा धक्का बसू शकतो. या शिक्षेनंतर, डब्ल्यूटीसी गुणतालिकेत इंग्लंडचे गुण ५० वरून ३८ पर्यंत घसरले असून, ते सातव्या स्थानावर आले आहेत. त्यांची गुणांची टक्केवारी (पीसीटी) देखील ३४.७२ वरून २६.३८ पर्यंत घसरली आहे.

आयसीसीच्या या निर्णयामुळे इंग्लंडच्या डब्ल्यूटीसी अंतिम फेरीत पोहोचण्याच्या आशांना मोठा धक्का बसला आहे. संघाचे एकूण गुण ३८ वर आले आहेत, तर गुणांची टक्केवारी ३४.७२ वरून २६.३८ पर्यंत घसरली आहे. तरीही, इंग्लंड सध्या सातव्या स्थानावर कायम आहे.

जो रुटने स्वीकारली शिक्षा

इंग्लंडचा कर्णधार जो रूटने हा आरोप मान्य केला. त्याने शिक्षाही स्वीकारली, त्यामुळे औपचारिक सुनावणीची गरज टळली. सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांनी ही शिक्षा लागू केली. मैदानातील पंच एड्रियन होल्डस्टॉक आणि नितीन मेनन, थर्ड अंपायर, रॉड टकर आणि फोर्थ अंपायर, ग्रॅहम लॉईड यांनी इंग्लंडवर हा आरोप लावला होता.

न्यूझीलंडचा ऐतिहासिक विजय

न्यूझीलंडने ओव्हल कसोटीत शानदार कामगिरी करत इंग्लंडला २५३ धावांनी पराभूत करून तीन सामन्यांची मालिका १-१ अशी बरोबरीत आणली. इंग्लंडने लॉर्ड्सवर पहिली कसोटी जिंकली होती, पण दुसऱ्या कसोटीत किवींनी जोरदार पुनरागमन केले.४६३ धावांचे लक्ष्य गाठताना, इंग्लंडचा संघ अंतिम दिवशी १८२/५ अशा स्थितीत होता, पण वेगवान गोलंदाज मॅट हेन्रीने खालच्या फळीला उद्ध्वस्त केले. हेन्रीने डावात ६/२९ आणि सामन्यात एकूण ११/१०९ अशी कामगिरी केली. इंग्लंडविरुद्ध कोणत्याही न्यूझीलंडच्या गोलंदाजाची ही सर्वोत्तम कसोटी कामगिरी आहे. हेन्रीच्या ३५ कसोटी सामन्यांच्या कारकिर्दीतील ही पहिल्यांदाच १० विकेट्सची जबरदस्त कामगिरी केली. न्यूझीलंडसाठी हा विजय ऐतिहासिक होता. इंग्लंड दौऱ्याच्या ९५ वर्षांच्या इतिहासातील हा त्यांचा केवळ सातवा कसोटी विजय होता. ओव्हलवरील हा न्यूझीलंडचा दुसरा विजय होता, यापूर्वी त्यांनी १९९९ मध्ये येथे विजय मिळवला होता.

Pak W vs Ban W: मैदानात फ्लॉप, रील्समध्ये टॉप! पराभवाच्या हॅटट्रिकनंतर पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर; बांग्लादेशचा ऐतिहासिक विजय

Web Title: Eng vs nz oval test england defeat icc wtc points deduction slow over rate fine

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 22, 2026 | 02:18 PM

Topics:  

  • ENG vs NZ
  • ICC
  • Test Match
  • WTC Points Table

संबंधित बातम्या

Donald Trump vs ICC: ट्रम्प प्रशासनाचा आंतरराष्ट्रीय न्यायालयावर मोठा प्रहार; संपूर्ण आयसीसीवरच बंदी घालण्याची योजना
1

Donald Trump vs ICC: ट्रम्प प्रशासनाचा आंतरराष्ट्रीय न्यायालयावर मोठा प्रहार; संपूर्ण आयसीसीवरच बंदी घालण्याची योजना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.