hashmatullah shahidi
आयसीसीने शनिवारी एका निवेदनात म्हटले आहे की, ‘शाहिदीने आयसीसी आचारसंहितेच्या कलम २.१०.१० चे उल्लंघन केले आहे, जे फलंदाजी करताना खेळपट्टीचे जाणीवपूर्वक किंवा टाळता येण्याजोगे नुकसान करण्याशी संबधित आहे.’ चेन्नई येथील एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यादरम्यान, फलंदाजी करताना खेळपट्टीचे नुकसान केल्याचे ICC च्या निदर्शनास आले.यासाठी शाहिदीला शिस्तभंगाच्या नोंदीसह एक डिमेरिट पॉइंट देखील देण्यात आला आहे.
सामन्यादरम्यान, फलंदाजी करताना खेळपट्टीवर धावल्याबद्दल शाहिदीला दोन वेळा अनधिकृत चेतावणी देण्यात आली. त्यानंतर अफगाणिस्तानच्या डावाच्या ३१ व्या षटकात त्याला अधिकृत चेतावणी मिळाली. मात्र, ४० व्या षटकात खेळपट्टी ओलांडून धावण्याची चूक त्याने पुन्हा केली. वारंवार चेतावणी देऊनही नियमांचे पालन न केल्यामुळे अफगाणिस्तानवर पाच धावांचा दंड आकारण्यात आला.
हशमतुल्ला शाहिदीने आपली चूक मान्य केली आणि आयसीसी एलिट पॅनेलचे सामनाधिकारी रंजन मदुगल्ले यांनी दिलेली शिक्षा स्वीकारली. त्यामुळे औपचारिक सुनावणीची आवश्यकता झाली नाही. हा आरोप मैदानातील पंच ख्रिस गॅफनी आणि रोहन पंडित, तिसरे पंच रिचर्ड इलिंगवर्थ आणि चौथे पंच वीरेंद्र शर्मा यांनी नोंदवला होता. आयसीसीच्या नियमांनुसार, लेव्हल १ उल्लंघनासाठी अधिकृत चेतावणी, खेळाडूच्या सामना शुल्काच्या ५० टक्क्यांपर्यंत दंड आणि एक किंवा दोन डिमेरिट पॉइंट्सची तरतूद आहे.
सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने ४४.२ षटकांत २१८ धावा केल्या. कर्णधार हशमतुल्ला शाहिदीने शानदार फलंदाजी करत १०२ धावा केल्या, जे त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील पहिले शतक होते. परंतु, भारतीय वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाने भेदक गोलंदाजी करत नऊ षटकांत २३ धावा देऊन पाच विकेट्स घेतले.
२१९ धावांचे लक्ष्य गाठताना, सलामीवीर यशस्वी जयस्वाल आणि रोहित शर्मा यांनी चांगली सुरुवात केली. या दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी १७० धावांची भागीदारी झाली. रोहित शर्माने ७९ धावा केल्या, तर जयस्वालने ८६ चेंडूंमध्ये ११० धावांची नाबाद खेळी केली. जयस्वालच्या खेळीत १४ चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता. भारताने केवळ एक विकेट गमावून १२८ चेंडू शिल्लक असताना लक्ष्य गाठले आणि नऊ विकेट्सने शानदार विजय नोंदवला.
FIFA World Cup 2026 मध्ये इतिहास! सर्वात जलद 100 गोल्सचा टप्पा पूर्ण, फुटबॉलचा रोमांचक शो






