ENG vs WI: Joe Root Express Susat! Creates history for England in ODI cricket...
ENG vs WI : इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना इंग्लंडने तीन विकेट्सने आपल्या खिशात घातला. या विजयासह इंग्लंडने मालिकेत २-० अशी आघाडी घेऊन मालिका आपल्या नावावर केली आहे. या सामन्यात जो रूटने इंग्लंडसाठी एक खास विक्रम प्रस्थापित केला. तो इंग्लंडसाठी ७००० धावा करणारा पहिला फलंदाज बनला आहे.
जो रूटने या सामन्यात १६६ धावांची शानदार खेळी केली. जो रूटच्या या खेळीमुळे इंग्लंडने वेस्ट इंडिजविरुद्ध ४८.५ षटकांत ७ गड्यांच्या मोबदल्यात ३०९ धावा केल्या आणि ३ गडी राखून सामना जिंकला. १६६ धावांच्या खेळीदरम्यान रूटने एकदिवसीय सामन्यात ७००० धावा करणारा पहिला इंग्लिश फलंदाज बनून इतिहास रचला आहे.
हेही वाचा : IPL 2025 मध्ये पराभूत होऊनही मुंबई इंडीयन्स होणार मालामाल! इतके कोटी मिळणार संघाला
इंग्लंडसाठी एकदिवसीय सामन्यामध्ये ७००० धावा करणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे. रूटला ७००० धावांचा टप्पा पार करण्यासाठी त्याला ८४ धावांची गरज होती आणि त्याने इंग्लंडच्या डावाच्या ३३ व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर मॅथ्यू फोर्डने टाकलेल्या चौथ्या चेंडूवर चौकार मारून ही कामगिरी करून दाखवली आहे. यापूर्वी हा विक्रम इंग्लंडचा विश्वविजेता कर्णधार इऑन मॉर्गनच्या नावावर जमा होता. मॉर्गनने एकदिवसीय सामन्यात इंग्लंडसाठी ६९५७ धावा केल्या आहेत.
रूट कार्डिफमध्ये खेळवण्यात आलेल्या वेस्ट इंडिजविरुध्दच्या सामन्यात इंग्लंडसाठी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि त्याने ब्रूक (३६ चेंडूत ४७) सोबत तिसऱ्या विकेटसाठी ८५ धावा केल्या. तसेच त्याने विल जॅक्स (५८ चेंडूत ४९) सोबत सहाव्या विकेटसाठी १४३ धावा जोडल्या. यासह, त्याने एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक धावा करणारा इंग्लंडचा पहिला खेळाडू बनण्याचा मान मिळवला आहे. त्याचबरोबर तो इंग्लंडसाठी कसोटीत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज देखील बनला आहे.
हेही वाचा : ऑस्ट्रेलियाचा दिग्गज ग्लेन मॅक्सवेलने एकदिवसीय क्रिकेटला केला रामराम! केव्हा खेळला होता शेवटचा सामना?
३४ वर्षीय जो रूटने फलंदाज गेल्या महिन्यात कसोटी क्रिकेटमध्ये १३,००० धावा करणारा पहिला इंग्लिश फलंदाज ठरला होता. भारताविरुद्धच्या खेळवण्यात येणाऱ्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत तो बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखालील संघाचा महत्त्वाचा फलंदाज असणार आहे. पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारत इंग्लंडचा सामना करणार आहे. मालिकेतील पहिला सामना २० ते २४ जून दरम्यान हेडिंग्ले, लीड्स येथे खेळला जाणार आहे. जर त्याने येत्या पाच सामन्यांमध्ये १५४ धावा केल्या तर तो भारताविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये ३००० धावा करणारा जगातील पहिला फलंदाज ठरणार आहे.