फोटो सौजन्य : IndianPremierLeague
मुबंई इंडीयन्सच्या संघाची या सिझनमध्ये सुरुवात फार काही चांगली झाली नाही. पण संघाने दमदार कमबॅक केला आणि सलग ६ सामन्यात विजय मिळवुन प्लेऑफमध्ये स्थान पक्के केले होते. एलिमिनेटर सामना हा मुबंई इंडीयन्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यामध्ये खेळवण्यात आला होता. या सामन्यात मुंबईच्या संघाने त्याच्या चांगल्या कामगिरीमुळे विजय मिळवुन क्वालिफायर २ मध्ये स्थान पक्के केले होते. क्वालिफायर २ चा सामना काल १ जून रोजी पार पडला या सामन्यात पंजाबच्या संघाने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावर मुबंई इंडीयन्सच्या संघाला पराभूत करुन फायनलमध्ये स्थान पक्के केले आहे.
आता मुंबईचा संघ हा स्पर्धेबाहेर झाला आहे, पण त्यांना तिसऱ्या क्रमांकावर राहिल्यामुळे त्यांना बक्षीस मिळणार की नाही असा प्रश्न चाहत्यांना आहे, याचे उत्तर आम्ही तुम्हाला या वृतामध्ये देणार आहोत. पराभवानंतर कर्णधार हार्दिक पंड्याही खूप निराश दिसत होता. मात्र, स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतरही मुंबई इंडियन्सला बक्षीस म्हणून कोट्यवधी रुपये मिळणार आहेत.
आयपीएल २०२५ मध्ये एकूण बक्षीस रक्कम ४६.५ कोटी रुपये ठेवण्यात आली आहे, जी ४ प्लेऑफ संघांमध्ये विभागली जामार आहे. तथापि, यावेळी बीसीसीआयकडून बक्षीस रकमेची अधिकृत घोषणा झालेली नाही. तथापि, गेल्या वेळी तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या संघाला बीसीसीआयकडून ७ कोटी रुपये मिळाले होते. अशा परिस्थितीत, जर गेल्या वेळीप्रमाणे यावेळीही तिसऱ्या क्रमांकाच्या संघाला ७ कोटी रुपये दिले तर मुंबई इंडियन्सच्या खात्यात ७ कोटी रुपये येतील असे म्हटले जात आहे.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने २० षटकांत ६ गडी गमावून २०३ धावा केल्या. मुंबईकडून फलंदाजी करताना सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांनी 44-44 धावा केल्या. याशिवाय, शेवटी, नमन धीरने १८ चेंडूत ३७ धावा केल्या. पंजाब किंग्जकडून गोलंदाजी करताना अझमतुल्लाहने २ विकेट्स घेतल्या.
यानंतर, पंजाब किंग्जने १९ षटकांत ५ गडी गमावून हे लक्ष्य गाठले. पंजाब किंग्जकडून फलंदाजी करताना कर्णधार श्रेयस अय्यरने ४१ चेंडूत ८७ धावांची नाबाद खेळी केली. त्याच्या खेळीदरम्यान, अय्यरने ५ चौकार आणि ८ षटकार मारले. या काळात त्याचा स्ट्राईक रेट २१२.२० होता. तर नेहल वधेराने २९ चेंडूत ४८ धावा केल्या, ज्यात ४ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता.