फोटो सौजन्य : X
ऑस्टेलिया हा क्रिकेट विश्वामध्ये एक मजबूत संघ आहे, त्याना पराभूत करण्यासाठी समोरच्या संघाला घाम गाळावा लागतो. सध्या आयपीएल २०२५ सुरु आहे, यामध्ये अनेक ऑस्टेलियाचे दिग्गज खेळाडू देखील सामील झाले होते. यामध्ये ट्रविस हेड, पॅट कमिन्स, मार्कस स्टायनिस, ग्लेन मॅक्सवेल यांसारखे दिग्गज खेळाडूसमोर खेळणे म्हणजे तुमची तयारीही तशी असणे गरजेचे आहे. आयपीएल २०२५ मध्ये ग्लेन मॅक्सवेल आणि मार्कस स्टायनिस हे दोघेही पंजाब किंग्सचा भाग होते. मार्कस स्टायनिस याने संघासाठी चांगली कामगिरी केली आहे पण ग्लेन मॅक्सवेल या सिझनमध्ये पुर्णपणे फेल ठरला.
आता ग्लेन मॅक्सवेलच्या संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. सोमवार २ जून रोजी ग्लेन मॅक्सवेलने निवृत्तीची घोषणा केली. तो ऑस्ट्रेलियाकडून शेवटचा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २०२५ मध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळला होता. त्या स्पर्धेनंतर संघाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ याने देखील निवृत्तीची घोषणा केली. चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर, तो आयपीएल २०२५ मध्ये खेळताना दिसला पण तो विशेष कामगिरी करु शकला नाही, परंतु दुखापतीमुळे काही सामन्यांनंतर तो संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडला.
२०१२ मध्ये ऑस्ट्रेलियाकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा ग्लेन मॅक्सवेल दोन वेळा विश्वचषक विजेता आहे. त्याने १४९ एकदिवसीय सामन्यांमध्ये जवळपास ४००० धावा केल्या, तर गोलंदाज म्हणून त्याने ७९ विकेट्स घेतल्या. जेव्हा तो फलंदाजी करत असे तेव्हा तो एका योग्य फलंदाजासारखा दिसत असे आणि जेव्हा तो गोलंदाजी करत असे तेव्हा तो एका योग्य ऑफ-स्पिनरसारखा दिसत असे. तो ऑस्ट्रेलियासाठी एक मोठा सामना जिंकणारा खेळाडू ठरला आहे. २०२३ च्या विश्वचषकात अफगाणिस्तानविरुद्धचे त्याचे द्विशतक अजूनही सर्वांना आठवते कारण ते प्रतिकूल परिस्थितीत झाले होते.
GLENN MAXWELL ON HIS ODI RETIREMENT:
“I’ve talked about the 2027 World Cup with selectors and I said I don’t think I’m going to make that. I didn’t want to just hold on for a couple of series and almost play for selfish reasons”. pic.twitter.com/wZtyuL5WI0
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) June 2, 2025
2023 मध्ये ऑस्ट्रेलियासाठी ग्लेन मॅक्सवेल याने विश्वचषकामध्ये केलेल्या कामगिरी ही सर्वाच्या लक्षात राहणारी आहे. त्याने २०२३ च्या विश्वचषकामध्ये १०१ चेंडुमध्ये १४७ धावांचा नाबाद खेळी खेळली होती आणि संघाला विजय मिळवुन दिला होता.