फोटो सौजन्य – X (England Cricket)
भारत विरुद्ध इंग्लड यांच्यामध्ये कसोटी मालिकेला 20 जूनपासुन सुरुवात झाली आहे. या मालिकेचा पहिला सामना झाला आहे, यामध्ये टीम इंडीयाच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. तर दुसरा सामन्याला सुरुवात ही 2 जुलैपासुन होणार आहे. पहिल्या सामन्यामध्ये भारतीय संघाची फलंदाजी चांगली राहिली पण गोलंदाजीमध्ये भारताच्या गोलंदाजांनी निराश केले. दुसऱ्या सामन्यामध्ये भारतीय संघामध्ये बदल होणार आहेत. भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराह हा संघाचा भाग नसणार आहे. त्याच्या जागेवर कोणत्या खेळाडुला संधी मिळणार हे पाहणे महत्वाचे ठरेल.
आता इंग्लडच्या संघासंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. यामध्ये इंग्लडच्या संघाने दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी प्लेइंग ११ ची घोषणा केली आहे. भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडने १५ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर इंग्लंडच्या कसोटी संघात परतला आहे. भारताविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यासाठी त्याचा संघात समावेश करण्यात आला आहे. जोफ्रा आर्चर चार वर्षांनी इंग्लंडच्या कसोटी क्रिकेट संघात परतला आहे. इंग्लंड आणि भारतादरम्यानचा दुसरा कसोटी सामना २ जुलैपासून बर्मिंगहॅम येथे सुरू होणार आहे.
या आठवड्याच्या सुरुवातीला आर्चरने चार वर्षांहून अधिक काळानंतर पहिला रेड-बॉल सामना खेळला. चेस्टर-ले-स्ट्रीट येथे डरहमविरुद्धच्या चार दिवसांच्या सामन्यात तो ससेक्सकडून खेळला आणि त्याच्या सर्वोत्तम फॉर्मची झलक दाखवली. आर्चरने १८ षटकांत ३१ धावा केल्या आणि ३२ धावा देऊन एक बळी घेतला.
🚨 BREAKING 🚨
England has announced their squad for the second Test against India, starting July 2 at Edgbaston. 🏏
Jofra Archer returns to the Test setup after 4 years. 👏#Cricket #ENGvIND #Test #ECB pic.twitter.com/HScXHRgc7C
— Sportskeeda (@Sportskeeda) June 26, 2025
भारताविरुद्ध अँडरसन तेंडुलकर मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात आर्चर आणि मार्क वूडशिवाय इंग्लंडचा गोलंदाजीचा हल्ला कमकुवत दिसत होता. आयपीएल २०२५ मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळणारा आर्चर दुखापतींमुळे चार वर्षांपासून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळलेला नाही. आर्चर २०२१ पासून इंग्लंडसाठी फक्त व्हाईट-बॉल फॉरमॅटमध्ये खेळला आहे. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने या महिन्याच्या सुरुवातीला सांगितले होते की आर्चरला रेड-बॉल क्रिकेटमध्ये परतायचे आहे.
भारत आणि इंग्लंडने २० जून रोजी लीड्समध्ये त्यांच्या नवीन जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेला सुरुवात केली. तथापि, पहिल्या सामन्यात भारतीय संघाला ५ विकेट्सने पराभव पत्करावा लागला. या सामन्यात एकूण ७ शतके झाली, त्यापैकी पाच शतके भारतीय फलंदाजांनी केली.
बेन स्टोक्स (कर्णधार), शोएब बशीर, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, सॅम कुक, झॅक क्रॉली, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, ऑली पोप, जो रूट, जेमी स्मिथ, जोश टंग, ख्रिस वोक्स, जोफ्रा आर्चर.