
भारत आणि इंग्लंडमध्ये 5 टी 20 सामन्यांची मालिका होणार आहे. यासाठी इंग्लंडने 17 खेळाडूंचा संघ जाहीर केला आहे. हॅरी ब्रूक इंग्लंडचे नेतृत्व करणार आहे. तर जेम्स कोल्स चा देखील टी 20 संघात समावेश करण्यात आला आहे. पाच सामन्यांची मालिका 1 ते 11 जुलै मध्ये खेळवली जाणार आहे.
इंग्लंडच्या संघात जॉर्डन कॉक्स, सोनी बेकर, सकीब महमूद यांची इंग्लंडच्या संघात समावेश झाला आहे. तर वेगवान गोलंदाज जेमी ओवरटन दुखापतीमुळे खेळू शकणार नाहीये. जॉर्डन कॉक्स, सोनी बेकर, सकीब महमूद हे आयसीसी टी 20 वर्ल्ड कप खेळू शकले नव्हते. त्यांना आता संधी देण्यात आली आहे.
Our 17-player squad is IN! 💪 Excitement building ahead of our five-match IT20 series with India! Click below for the full story: — England Cricket (@englandcricket) June 22, 2026
इंग्लंडचा टी 20 मालिकेसाठी संघ: हॅरी ब्रूक (कर्णधार), रेहान अहमद, जोफ्रा आर्चर, सोनी बेकर, टॉम बँटन, जेकब बेथेल, जोस बटलर, जेम्स कोल्स, जॉर्डन कॉक्स, सॅम करन, लियाम डॉसन, विल जॅक्स, साकिब महमूद, आदिल रशीद, फिल सॉल्ट, जोश टोंगे आणि ल्यूक वूड.
IND Vs IRE: 26 जून पासून रंगणार थरार! आयर्लंडने जाहीर केला संघ, ‘हा’ खेळाडू असणार कर्णधार
आयर्लंडने जाहीर केला संघ
लवकरच भारतीय संघ आयर्लंड दौऱ्यावर जाणार आहे. आयर्लंड आणि भारतीय संघ टी 20 सिरिज खेळणार आहे. दरम्यान आयर्लंड संघाने भारताविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या सिरिजसाठी आपल्या संघाची घोषणा केली आहे. आयर्लंडने या सिरिजसाठी नवा कर्णधार नियुक्त केला आहे. भारतीय संघ टी 20 क्रिकेटमध्ये मजबूत आणि ताकदवान संघ आहे. आम्ही आमची नवीन सुरुवात भारताविरुद्ध खेळून करत आहोत, त्याचा आम्हाला आनंद आहे. आमच्यासमोर भारतापेक्षा मजबूत संघ असू शकत नाही. आम्ही चांगला खेळ करू असा आम्हाला विश्वास आहे, असे कर्णधार लॅार्कन टकर म्हणाला.
दिल्ली-लखनौमध्ये मोठी डील? IPL 2027 Rishabh Pant ला 12 कोटींचे नुकसान? कुलदीप कुठून खेळणार?
आयर्लंडचा क्रिकेट संघ: लॅार्कन टकर, रॉड अडायर, बेन केलीटेज, गेरेथ डेलानी, जॉर्ज डोकरेल, स्टीफन डोहेनी, मॅथ्यू हम्फ्रीज, मॅथ्यू हॉलार्ड, हॅरी टेक्टर, टिम टेक्टर, रुबेन विल्सन.