आयपीएल ट्रेड 2027 (फोटो- ट्विटर)
ऋषभ पंत एलएसजीचा कर्णधार होता. मात्र आयपीएल 2026 मध्ये अपयशी ठरल्यावर कर्णधारपद सोडले आहे. त्यानंतर तो आपल्या जुन्या म्हणजेच दिल्ली कॅपिटल्सच्या संघात परतणार असे म्हटले जात होते. झालेल्या ट्रेडनुसार ऋषभ पंत दिल्ली कॅपिटल्समध्ये परतला आहे. तर कुलदीप यादव लखनौच्या संघातून खेळताना दिसणार असल्याची शक्यता आहे.
2025 मध्ये ऋषभ पंतचे नाव चर्चेत आले होते. तो आयपीएलमधील सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. एलएसजीने ऋषभ पंतला 27 कोटींमध्ये खरेदी केले होते. आता एलएसजीने दिल्ली कॅपिटल्ससोबत ट्रेड करून ऋषभ पंतला रिलीज केल्याचे समोर येत आहे. त्यामुळे आता ऋषभ पंत दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना दिसणार आहे.
🚨 Announcement 🚨 Rishabh Pant and Kuldeep Yadav complete high-profile trade between @DelhiCapitals and @LucknowIPL. Rishabh Pant all set to rejoin #DC at INR 15 Crore whereas Kuldeep Yadav will join #LSG at INR 13.5 Crore. More Details ▶️ https://t.co/64HeOX143I… pic.twitter.com/tIEvj7fgNo — IndianPremierLeague (@IPL) June 23, 2026
लखनौची गोलंदाजी होणार मजबूत
आता कुलदीप यादव लखनौच्या संघाकडून खेळताना दिसणार आहे. कुलदीप यादव भारती संघातील एक प्रमुख गोलंदाज आहे. गेली 5 वर्षे तो दिल्ली कॅपिटल्सकडून खेळत आहे. त्यावेळेस त्याने 65 सामन्यांमध्ये 72 विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे 2027 मध्ये एलएसजीच्या संघाची ताकद वाढलेली असणार आहे.
अति नखरे नडणार! Hardik Pandya ची हकालपट्टी होणार? राजस्थानच्या ‘या’ खेळाडूसाठी मेगा ट्रेड?
राजस्थानच्या ‘या’ खेळाडूसाठी मेगा ट्रेड?
यंदाच्या आयपीएल हंगामात मुंबई इंडियन्सला स्पर्धेबाहेर जावे लागले होते. कर्णधार हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सचा संघ सपशेल अपयशी ठरला होता. त्यानंतर मुंबई इंडियन्सच्या मॅनेजमेंटने 2027 च्या आयपीएल हंगामासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. 2027 मध्ये मुंबई इंडियन्सच्या संघात फार मोठे बदल दिसून येऊ शकतात. मात्र हार्दिक पंड्याचा पत्ता कट होण्याची शक्यता जास्त प्रमाणात आहे.
हार्दिक पंड्या स्वतःच दूसरा संघ शोधत असल्याचे म्हटले जात आहे. मुंबई इंडियन्समध्ये त्याला संधी मळण्याची शक्यता कमी आहे.यातच एक मोठी बातमी समोर येत आहे. आयपीएल 2027 च्या लिलावात मुंबई इंडियन्स मोठे बदल करू शकते. राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात ट्रेड होऊ शकते. मुंबई इंडियन्स आयपीएल 2027 मध्ये राजस्थान रॉयल्सचा डावखुरा फलंदाज यशस्वी जयस्वालला खरेदी करण्याची चर्चा सुरू आहे. मुंबई इंडियन्सच्या ट्रेड लिस्टमध्ये राजस्थान रॉयल्सचा सलामीचा फलंदाज यशस्वी जयस्वालचा समावेश असल्याचे म्हटले जात आहे.






