फोटो सौजन्य - सोशल मीडिया
रणजी ट्रॉफी 2024-25 : भारताचा स्टार खेळाडू विराट कोहलीचे चाहते हे फक्त भारताचाच नाही तर जगभरामध्ये आहेत. सोशल मीडियावर नेहमीच त्याच्या कामगिरीचे त्याचबरोबर त्याने केलेल्या घटनेचे अनेक व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत असतात. विराट कोहलीने भारतीय क्रिकेटला मोठ्या स्तरावर नेण्यात महत्वाचे योगदान दिले आहे. विराट कोहलीचे वैयक्तिक आयुष्य हे बऱ्यापैकी प्राव्हेट ठेवतो. पण जेव्हा तो मैदानावर येतो तेव्हा चाहते त्याला पाहण्यासाठी त्याला भेटण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात. आता सोशल मीडियावर विराट कोहलीचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.
आज रणजी ट्रॉफीमध्ये दिल्ली आणि रेल्वे यांच्यात सामना खेळला जात आहे. टीम इंडियाचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीही या सामन्यात खेळत आहे. विराट कोहली रणजी स्पर्धेचा सामना खेळणार हे समजल्यापासून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु झाल्या होत्या. कोहली १३ वर्षांनंतर रणजीमध्ये परतला आहे. विराट कोहली जो सामना खेळत आहे हा सामना दिल्लीमधील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जात आहे. कोहलीला पाहण्यासाठी चाहते मोठ्या संख्येने स्टेडियमवर पोहोचले आहेत. अरुण जेटली स्टेडियममध्ये सर्व चाहत्यांना मोफत प्रवेश मिळाला आहे. सामन्यादरम्यान कोहलीचा एक मोठा चाहता मैदानात घुसला, आता या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे.
टीम इंडियाच्या क्रिकेट संघात आणखी एक डीएसपी, मोहम्मद सिराजनंतर आता या क्रिकेटपटूला मिळाली वर्दी
रणजी ट्रॉफीमध्ये कोहलीचा खेळ पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत होते, आता चाहत्यांची प्रतीक्षा संपली आहे. कोहली दिल्लीकडून रणजी सामने खेळत आहे. कोहलीचे वेड इतके आहे की रणजी सामन्यादरम्यान पहिल्यांदाच मैदान इतके भरलेले दिसले. सामन्यादरम्यान विराटचा एक मोठा चाहता कोहलीला मैदानावर पोहोचला होता, त्यानंतर हा चाहता कोहलीच्या पाया पडला. या घटनेचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहेत.
KING KOHLI IS AN EMOTION..!!!! 🐐
– The Moments fan entered the ground and touched Virat Kohli’s feet. 🥹❤️ pic.twitter.com/RsSgFKeK2t
— Tanuj Singh (@ImTanujSingh) January 30, 2025
विराट कोहलीची अलीकडची लाल चेंडू क्रिकेटमधील कामगिरी अत्यंत खराब झाली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये कोहलीची कामगिरी काही खास नव्हती. कोहलीने या मालिकेत १९० धावा केल्या होत्या. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये टीम इंडियाच्या पराभवानंतर बीसीसीआयने सर्व खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेट खेळण्याची सूचना केली होती. आता या सामन्यात कोहली चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसणार आहे.
मागील काही मालिकांमध्ये विराट कोहली विशेष कामगिरी करू शकला नाही. T२० विश्वचषक २०२४ च्या फायनलमध्ये त्याने महत्वाची कामगिरी केली होती. त्यानंतर कसोटी क्रिकेटमध्ये तो विशेष करू शकला नाही. त्याचबरोबर २०२४ चे वर्ष त्याच्यासाठी फार काही चांगले राहिले नाही.