Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विराट कोहलीसाठी चाहत्यांचा ‘वेडी’ गर्दी! हजारोंच्या गाराड्यात ‘किंग’ अडकला वडोदरा विमानतळावर; पहा VIDEO

११ जानेवारीपासून भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे. भारतीय संघाचा स्टार खेळाडू विराट कोहली मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी वडोदरा येथे पोहचला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jan 07, 2026 | 08:30 PM
A 'crazy' crowd of fans for Virat Kohli! The 'King' was stuck at the airport amidst thousands of people; watch the VIDEO.

A 'crazy' crowd of fans for Virat Kohli! The 'King' was stuck at the airport amidst thousands of people; watch the VIDEO.

Follow Us
Close
Follow Us:

A crowd gathered in Vadodara to see Virat Kohli : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात ११ जानेवारीपासून तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पहिला सामाना वडोदरा येथे खेळला जाणार आहे. दरम्यान भारतीय संघाचा स्टार खेळाडू विराट कोहली मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी वडोदरा येथे दाखल झाला आहे. दरम्यान, विराट कोहली वडोदरा येथे दाखल होताच चाहत्यांनी त्याच्या भोवती चांगलीच गर्दी केल्याचे दिसून आले. त्यामुळे विमानतळावरून विराटला गाडी गाठण्यासाठी फार मोठा संघर्ष करावा लागला.

११ जानेवारी रोजी वडोदरा येथे भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यापूर्वी विराट कोहलीला बघण्यासाठी चाहत्यांची गर्दी चांगलीच चर्चेचा विषय ठरली. बुधवारी वडोदरा विमानतळावर कोहलीची एक झलक पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली होती, ज्यामुळे कोहलीला त्या ठिकाणावरून हलूही शकला नाही. त्यावेळी तो खूपच अस्वस्थ असल्याचे दिसून आला. या प्रकाराचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे.

हेही वाचा : T20 World Cup 2026 : टी-20 विश्वचषक 2026 पूर्वी श्रीलंकेने टाकला मोठा डाव! ‘या’ भारतीय खेळाडूवर सोपवली मोठी जबाबदारी

यावेळी विराट कोहली त्याच्या नवीन लूकमध्ये दिसून आला. त्याने चष्मा आणि काळा टी-शर्ट घातलेला होता. वडोदरा विमानतळावर चाहत्यांनी त्याचे नाव घेतले आणि फोटो आणि सेल्फी काढण्याचा प्रयत्न देखील केला. तथापि, सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला.  सुरक्षा कर्मचाऱ्यांमुळे त्याला सुरक्षितपणे त्याच्या गाडीपर्यंत पोहोचवण्यात यश आले.

#WATCH | Gujarat: Former Indian Captain and Star Cricketer Virat Kohli arrives at Vadodara for Team India’s ODI match against New Zealand on 11th January. pic.twitter.com/cQbhCghMZy — ANI (@ANI) January 7, 2026

विराट कोहलीचा शानदार फॉर्म

मागील वर्षीच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून विराट कोहलीने आपल्या बॅटने चांगलाच धुमाकूळ घातला. तो ऑस्ट्रेलियात सलग दोन वेळा शून्यावर बाद झाल्यानंतर, त्याने मालिकेचा शेवट नाबाद अर्धशतकाने केला होता. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या घरच्या वनडे मालिकेत त्याने हा फॉर्म कायम राखत दोन शतके आणि एक अर्धशतक ठोकले. त्यानंतर त्याने विजय हजारे ट्रॉफीमध्ये दिल्लीकडून खेळताना एक शतक आणि एक अर्धशतक झळकावले होते. त्यामुळे आता न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत देखील विराट कोहलीकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असणार आहे.

हेही वाचा : 2026 च्या टी-२० विश्वचषकासाठी नेपाळ संघाची घोषणा! ‘या’ खेळाडूंची लागली लॉटरी; रोहित पौडेल करणार नेतृत्व

२०२६ च्या टी-२० विश्वचषकासाठी न्यूझीलंड संघ जाहीर

टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेला सुरुवात होण्यासाठी एका महिन्याचा कालावधी शिल्लक असताना २०२६ च्या टी-२० विश्वचषकासाठी न्यूझीलंडने आपला संघ जाहीर केला आहे. न्यूझीलंडचा संघाची धुरा मिचेल सँटनरच्या खांद्यावर सोपवण्यात आली असून सँटनर हा विश्वचषकातील सर्वात अनुभवी खेळाडू असणार आहे, तसेच तो त्याच्या नवव्या आयसीसी स्पर्धेत खेळताना दिसले.

Web Title: Fans crowd vadodara airport for virat kohli watch video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 07, 2026 | 08:30 PM

Topics:  

  • IND vs NZ
  • viral video
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

Virat Kohli च्या नागिण डान्सने चाहते हसून लोटपोट, राजस्थान रॉयल्सच्या सामन्यापूर्वीचा Video Viral
1

Virat Kohli च्या नागिण डान्सने चाहते हसून लोटपोट, राजस्थान रॉयल्सच्या सामन्यापूर्वीचा Video Viral

नादच खुळा! Las Vegas मध्ये भारतीय तरुणीचा जलवा; भरतनाट्यम आणि हिप-हॉपच्या फ्युजनने स्टेजवर लावली आग, Video Viral
2

नादच खुळा! Las Vegas मध्ये भारतीय तरुणीचा जलवा; भरतनाट्यम आणि हिप-हॉपच्या फ्युजनने स्टेजवर लावली आग, Video Viral

वय अवघे 15, ऑरेंज कॅप, प्लेअर ऑफ द मॅच आणि Virat Kohli कडून खास गिफ्ट; 2 शब्दात किंगकडून वैभव सूर्यवंशीला कौतुकाची थाप
3

वय अवघे 15, ऑरेंज कॅप, प्लेअर ऑफ द मॅच आणि Virat Kohli कडून खास गिफ्ट; 2 शब्दात किंगकडून वैभव सूर्यवंशीला कौतुकाची थाप

नराधमांची हिंमत तर बघा…! भररस्त्यात दुचाकीवरुन जाताना महिलेसोबत लाजीरवाणं कृत्य, VIDEO पाहून संताप अनावर होईल
4

नराधमांची हिंमत तर बघा…! भररस्त्यात दुचाकीवरुन जाताना महिलेसोबत लाजीरवाणं कृत्य, VIDEO पाहून संताप अनावर होईल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.