Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 7 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs PAK: 55 वर ऑल आउट तोरा तर…! बाद करून दाखवला माज! फातिमा सनावर ICC ची कडक कारवाई

Fatima Sana Fined for Shafali Verma send off action: आयसीसीने पाकिस्तानी कर्णधार फातिमा सनावर कारवाई केली आहे. भारताविरुद्धच्या सामन्यादरम्यान पाकिस्तानी कर्णधार फातिमा सनाने शफाली वर्माला आक्षेपार्ह इशारा केला होता. यामुळे आयसीसीने तिच्यावर कारवाई केली आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Sep 07, 2026 | 05:40 PM
Fatima Sana Fined for Shafali Verma send off action

Fatima Sana Fined for Shafali Verma send off action

Follow Us
Follow Us:
  • शफालीला ‘Send-Off’ देणं पडलं भारी
  • ICCने घेतला मोठा निर्णय
  • फातिमा सनावर मोठी कारवाई
Fatima Sana penalised for send-off to Shafali Verma: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महिला आशिया कप २०२६ स्पर्धेतील सामना ५ सप्टेंबर रोजी खेळला गेला. भारताने हा सामना ७ विकेट्सने जिंकला आणि एकतर्फी विजय नोंदवला. या सामन्यात पाकिस्तान महिला क्रिकेट संघाची कर्णधार फातिमा सनाने भारताच्या शफाली वर्माला बाद केल्यानंतर तिला सेंड ऑफ चा इशारा केला.त्यानंतर आयसीसीने तिच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे.

IND vs PAK: आशिया कपमध्ये पुन्हा ‘महामुकाबला’! भारत-पाकिस्तान आमनेसामने येणार? पाहा संपूर्ण समीकरण

आयसीसीची फातिमा सनावर कारवाई

शनिवारी दुबईत झालेल्या सामन्यात फातिमाने शफालीला लक्ष्य केले. भारताच्या डावाची सुरुवात करताना शफालीने आक्रमक पवित्रा घेतला, पण फातिमाच्या सहाव्या चेंडूवर ती बाद झाली. शफालीने चेंडू थेट फातिमाच्या दिशेने खेळला आणि पाकिस्तानी कर्णधाराने सोपा झेल घेतला. त्यानंतर फातिमाने पॅव्हेलियनकडे हातवारे इशारे केले. कर्णधार फातिमा सनाने केलेला तिला (Send Off) सेंड ऑफ म्हणजेच बाहेर जाण्याचा रस्ता दाखवला. आयसीसीने हे कृत्य आयसीसी आचारसंहितेच्या कलम २.५ चे उल्लंघन मानले आहे.

हा नियम अशा शब्दांशी, कृतींशी किंवा हावभावांशी संबंधित आहे, ज्यामुळे बाद झालेल्या फलंदाजाचा अपमान होऊ शकतो किंवा त्याच्याकडून आक्रमक प्रतिक्रिया येऊ शकते. आयसीसीने आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल फातिमा सनावर तिच्या सामना शुल्काच्या १० टक्के दंड आकारला आहे. तिला एक डिमेरिट पॉईंटही देण्यात आला आहे. २४ महिन्यांतील हा तिचा दुसरा गुन्हा होता. यापूर्वी, ६ ऑगस्ट २०२५ रोजी डब्लिनमध्ये आयर्लंडविरुद्धच्या टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान सॅनला एक डिमेरिट पॉईंट मिळाला होता.फातिमाने आपला गुन्हा कबूल केला आहे आणि आयसीसी आंतरराष्ट्रीय सामनाधिकारी पॅनेलच्या सुप्रिया दास यांनी सुचवलेल्या शिक्षा स्वीकारल्या, त्यामुळे औपचारिक सुनावणीची आवश्यकता भासली नाही.

भारताचा दणदणीत विजय

भारताविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानचा संघ १८.१ षटकांत ५५ धावांवर सर्वबाद झाला. मुनीबा अली आणि शवाल झुल्फिकार यांनी १३ आणि १४ धावा करून सर्वाधिक धावा केल्या. इतर कोणत्याही फलंदाजाने दुहेरी आकडा गाठला नाही. भारताकडून श्री चरणीने चार षटकांत सात धावा देऊन तीन विकेट्स घेतले, तर प्रेमा रावतनेही तीन विकेट्स घेतले. लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने ८.४ षटकांत ३ विकेट्स गमावून ५७ धावा केल्या. भारताकडून हरमनप्रीत कौरने १८ चेंडूंमध्ये नाबाद १८ धावा करून सर्वाधिक धावा केल्या. दीप्ती शर्मानेही १४ चेंडूंमध्ये नाबाद १२ धावा केल्या. सलामीवीर स्मृती मंधाना आणि शफाली वर्मा यांनी अनुक्रमे ९ आणि १२ धावा केल्या.

Duleep Trophy 2026: नुसते वादळ अन् प्रतिस्पर्धी चक्काचूर! Ishan Kishan ची डबल सेंचुरी अन्…

Web Title: Fatima sana fined shafali verma send off icc action

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 07, 2026 | 05:40 PM

Topics:  

  • Fatima Sana
  • ICC
  • IND VS PAK
  • Shafali Verma

संबंधित बातम्या

IND vs PAK: आशिया कपमध्ये पुन्हा ‘महामुकाबला’! भारत-पाकिस्तान आमनेसामने येणार? पाहा संपूर्ण समीकरण
1

IND vs PAK: आशिया कपमध्ये पुन्हा ‘महामुकाबला’! भारत-पाकिस्तान आमनेसामने येणार? पाहा संपूर्ण समीकरण

India vs Pakistan: पैसे संपले अन् रडकुंडीला आले! भारत-पाकिस्तान पुन्हा आमनेसामने? ICC थेट…
2

India vs Pakistan: पैसे संपले अन् रडकुंडीला आले! भारत-पाकिस्तान पुन्हा आमनेसामने? ICC थेट…

Women’s Asia cup 2026: पाकिस्तानचा खेळ खल्लास! आता कोणाचा गेम करणार? सेमीफायनलमध्ये भारताचा ‘या’ संघाशी होणार महामुकाबला
3

Women’s Asia cup 2026: पाकिस्तानचा खेळ खल्लास! आता कोणाचा गेम करणार? सेमीफायनलमध्ये भारताचा ‘या’ संघाशी होणार महामुकाबला

एक डाव, दोन वर्ल्ड रेकॉर्ड! Shafali Verma ने पाकिस्तानविरुद्ध केली ‘ही’ ऐतिहासिक कामगिरी; २२व्या वर्षी दिग्गजांनाही टाकले मागे
4

एक डाव, दोन वर्ल्ड रेकॉर्ड! Shafali Verma ने पाकिस्तानविरुद्ध केली ‘ही’ ऐतिहासिक कामगिरी; २२व्या वर्षी दिग्गजांनाही टाकले मागे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.