
शेफाली वर्मा
झिम्बाॅम्बे विरुद्ध खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात शेफाली वर्मावर आयसीसीच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे समोर आले आहे. आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी तिला आयसीसीकडून अधिकृत ताकीद यासोबतच तिच्या शिस्तीच्या रेकॉर्डमध्ये एका डिमेरिट पॉईंटची देखील नोंद करण्यात आली आहे.
रायपूर येथे झालेल्या दुसऱ्या टी 20 सामन्यात शेफाली हिने खेळाशी संबंधित नियमांचे उल्लंघन केल्याचे अंपायरच्या निदर्शनास आले. आयसीसीच्या माहितीनुसार, शेफाली वर्मा हिने खेळाडू आणि सपोर्ट स्टाफसाठी ठरवून दिलेल्या आचारसंहितेच्या लेवल-१ चे उल्लंघन केल्याचे म्हटले आहे. तिच्यावर अनुच्छेद २.२ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. आयसीसीच्या नियमांनुसार, खेळाडूंनी सामन्यादरम्यान मैदानावर नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे.
ही घटना भारताची गोलंदाजी सुरू असताना 12 व्या ओव्हरमध्ये घडली. श्री चरणी गोलंदाजी करत असताना मिड ऑफमध्ये असलेल्या शेफाली वर्माने फलंदाज चिपो मुगेरी-तिरिपानोचा कॅच सोडला. हा कॅच सोडल्याने रागाच्या भरात शेफाली वर्माने बॉल जमिनीवर फेकून दिला. खेळाच्या नियमांनुसार क्रिकेट साहित्याचा असा गैरवापर करणे किंवा मैदानावर रागाचे प्रदर्शन करणे आचारसंहितेच्या विरुद्ध मानले जाते.
भारतीय महिला संघ : स्मृति मंधाना (कर्णधार), शेफाली वर्मा, अनुष्का शर्मा, हरमनप्रीत कौर, निकी प्रसाद, दीप्ति शर्मा, ऋचा घोष (विकेटकीपर), अरुंधति रेड्डी, श्री चरणी, नंदनी शर्मा आणि क्रांति गौड.
IND Vs ZIM : शेफाली-स्मृतीचा धुमधडाका! झिम्बाब्वेला लोळवत भारताने जिंकली मालिका
झिम्बॉब्वे महिला संघ : केलिस नधलोवु, बिलव्ड बिजा, मोडेस्टर मुपाचिक्वा (विकेटकीपर), शार्न मेयर्स, न्याशा ग्वानज़ुरा, मिशेल मावुंगा, चिपो मुगेरी-तिरिपानो, फ्रांसिस्का चिपारे, जोसेफिन नकोमो (कर्णधार), ओलिंडर चारे आणि तेंडाई मकुशा.