Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 23 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs PAK: स्वतःची सुरक्षा वाऱ्यावर अन् Pakistan च्या उलट्या बोंबा; ‘या’ कारणासाठी भारतात जाण्यास नकार

IND Vs PAK: पाकिस्तानचे गृहमंत्री आणि पीसीबी प्रमुख मोहसिन नकवी यांनी द्विपक्षीय तणावाचे कारण देत संघाला भारत देशात जाण्यासाठी परवानगी देण्यास स्पष्ट नकार दिला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 23, 2026 | 02:54 PM
पाकिस्तान सरकार आणि गृह मंत्रालयाची मंजूरी नाही 

पाकिस्तान सरकार आणि गृह मंत्रालयाची मंजूरी नाही 

Follow Us
Follow Us:
  • आपले संघ भारतात पाठवण्यास पाकिस्तानचा नकार 
  • पाकिस्तान सरकार आणि गृह मंत्रालयाची मंजूरी नाही 
  • हॉकी टीमला देखील केले प्रतिबंधित 
IND Vs PAK: पुढील वर्षी भारतात जानेवारी 2027 मध्ये मास्टर्स क्रिकेट विश्वचषक (५०+ वयोगट) स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि तिथल्या गृह मंत्रालयाने पुढील वर्षी म्हणजेच जानेवारी २०२७ मध्ये भारताच्या यजमानपदाखाली पार पडणाऱ्या या स्पर्धेत आपला संघ पाठवण्यास स्पष्ट नकार दिला आहे. पाकिस्तान (Sports) संघाने ऐनवेळी माघार घेतल्यामुळे आता स्पर्धा आयोजकांना दुसऱ्या पर्यायी संघाचा शोध घ्यावा लागणार आहे.

पाकिस्तान वेटरन्स क्रिकेट असोसिएशनचे प्रमुख फवाद एजाज यांनी यासंदर्भात माहिती दिल्याचे समोर आले आहे. स्पर्धेच्या आयोजकांना पाकिस्तान संघाचे नाव मागे घेत असल्याबाबतची अधिकृत माहिती देण्यात आली आहे. भारतीय आयोजक आणि यजमान देशाने पाकिस्तानी वेटरन्स टीमला व्हिसा आणि उच्चस्तरीय सुरक्षा देण्याचे संपूर्ण आश्वासन दिले होते. या आश्वसनानंतर पीव्हीसीएने पीसीबी, परराष्ट्र मंत्रालय आणि गृह मंत्रालय यांच्याकडे NOC ची मागणी केली होती.

Shahid Afridi: शाहिद आफ्रिदीची पाकिस्तान क्रिकेटमध्ये पुन्हा एन्ट्री? माजी खेळाडूचा मोठा खुलासा

पाकिस्तानचे गृहमंत्री आणि पीसीबी प्रमुख मोहसिन नकवी यांनी द्विपक्षीय तणावाचे कारण देत संघाला भारत देशात जाण्यासाठी परवानगी देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. पाकिस्तानने श्रीलंकेत मागील वर्षी झालेल्या वेटरन्स वर्ल्ड कप जिंकली होती.  परंतु या वेळी त्यांना ते विजतेपद राखता येणार नाहीये.

साल २००८ मध्ये झालेल्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रीडा संबंधांवर विपरीत परिणाम झाला आहे. पाकिस्तानच्या नापाक कृतींमुळे दोन्ही देशांमधले संबंध ताणले गेले आहेत.  भारतीय पुरुष क्रिकेट संघाने जुलै 2008 मध्ये शेवटचा पाकिस्तानमध्ये दौरा केला होता. भारतीय संघाने शेवटची द्विपक्षीय मालिका खेळण्यासाठी २००५-०६ मध्ये पाकिस्तानचा दौरा केला होता.

ENG Vs PAK: बाबर आझमला इतिहासजमा करा! ४ वर्षे, ३९ डाव अन् झिरो सेंच्युरी, ‘फ्लॉप शो’ कायम

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रीडा क्षेत्रातील दुरावा क्रिकेटपुरता मर्यादित राहिलेला नाही. तर तो अन्य खेळांशी देखील जोडला गेला आहे. २००८ नंतर दोन्ही देशांमध्ये कोणतीही द्विपक्षीय हॉकी मालिका खेळवली गेलेली नाही. पाकिस्तान हॉकी संघाने शेवटच्या वेळी २०२३ च्या आशियाई चॅम्पियनशिप ट्रॉफीसाठी भारताचा दौरा केला होता. भारतीय पुरुष हॉकी संघाने अखेरची द्विपक्षीय मालिका खेळण्यासाठी २००६ मध्ये पाकिस्तानचा दौरा केला होता.  राजकीय आणि सुरक्षा कारणांमुळे क्रिकेटप्रमाणेच भारत आणि पाकिस्तानमधील द्विपक्षीय हॉकी संबंधही दीर्घकाळापासून लांब गेले आहेत.

💡

Frequently Asked Questions

  • Que: जानेवारी 2027 मध्ये कोणत्या स्पर्धेचे आयोजन?

    Ans: पुढील वर्षी भारतात जानेवारी 2027 मध्ये मास्टर्स क्रिकेट विश्वचषक स्पर्धा होणार.

  • Que: पाकिस्तानने नकार देण्याचे कारण काय?

    Ans: पीसीबी प्रमुख मोहसिन नकवी यांनी द्विपक्षीय तणावाचे कारण देत संघाला भारत देशात जाण्यासाठी परवानगी देण्यास स्पष्ट नकार दिला.

Web Title: Paakistan home ministry and pcb not approve to hockey and veterans visit in india sports tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 23, 2026 | 02:54 PM

Topics:  

  • IND VS PAK
  • India vs Pakistan
  • PCB
  • Sports News

संबंधित बातम्या

Cricket: युवा क्रिकेटपटूंचा धमाका! ‘पुना वेस्टर्न क्लब करंडक’मध्ये दोन संघांची विजयी सलामी
1

Cricket: युवा क्रिकेटपटूंचा धमाका! ‘पुना वेस्टर्न क्लब करंडक’मध्ये दोन संघांची विजयी सलामी

DSP Cup 2026: सार्थक पाटीलची अष्टपैलू कामगिरी; पुणे Cricket क्लबचा ‘या’ संघावर थरारक विजय
2

DSP Cup 2026: सार्थक पाटीलची अष्टपैलू कामगिरी; पुणे Cricket क्लबचा ‘या’ संघावर थरारक विजय

Squash: ना दबाव, ना माघार! १८ वर्षीय Anahat Singh ने आठ वेळच्या विश्वविजेतीला कसं हरवलं?
3

Squash: ना दबाव, ना माघार! १८ वर्षीय Anahat Singh ने आठ वेळच्या विश्वविजेतीला कसं हरवलं?

Asian Para Games 2026: शीतल देवी आणि तोमर कुमारचा धमाका! Compound Mix मध्ये आणले सुवर्णपदक
4

Asian Para Games 2026: शीतल देवी आणि तोमर कुमारचा धमाका! Compound Mix मध्ये आणले सुवर्णपदक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.