Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गोव्यात रंगणार Fide World Cup 2025 चा थरार ! पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून आनंद व्यक्त 

FIDE विश्वचषक २०२५ चे आयोजन गोव्यात करण्यात येणार असल्याचे बुद्धिबळाच्या जागतिक नियामक मंडळाने माहिती दिली. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आनंद व्यक्त केला आहे. 

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Aug 27, 2025 | 12:58 PM
The thrill of Fide World Cup 2025 will be held in Goa! Prime Minister Narendra Modi expresses happiness

The thrill of Fide World Cup 2025 will be held in Goa! Prime Minister Narendra Modi expresses happiness

Follow Us
Close
Follow Us:

Fide World Cup 2025 : FIDE विश्वचषक २०२५ चा थरार भारतात रंगणार आहे. हा विश्वचषक गोव्यात ३० ऑक्टोबर ते २७ नोव्हेंबर दरम्यान आयोजित करण्यात येणार आहे. बुद्धिबळाच्या जागतिक नियामक मंडळाने मंगळवारी याबाबत घोषणा केली आहे. या घोषणेनंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आनंद व्यक्त केला आहे. तसेच त्यांनी आशा व्यक्त केली की या स्पर्धेत रोमांचक सामने पाहायला मिळतील.

काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

पंतप्रधान मोदी यांनी प्रतिष्ठित FIDE विश्वचषक २०२५ चे गोव्यात आयोजन होणार म्हणून आनंद व्यक्त करताना आपल्या ‘X’ पोस्टमध्ये लिहिले आहे की, “भारत प्रतिष्ठित FIDE विश्वचषक २०२५ चे आयोजन करण्यास खूप आनंदी आहे आणि तेही दोन दशकांहून अधिक काळानंतर. बुद्धिबळ आपल्या तरुणांमध्ये लोकप्रिय होत आहे. मला खात्री आहे की या स्पर्धेत रोमांचक सामने पाहायला मिळतील आणि जगभरातील अव्वल खेळाडू त्यांची प्रतिभा दाखवतील.”

हेही वाचा : KCL 2025 : W,W,W.., पदार्पणाच्या सामन्यातच हॅटट्रिकसह 5 फलंदाजांची शिकार! सॅमसनच्या संघाला ‘या’ खेळाडूने पाजले पाणी

सुरुवातीला यजमानपदासाठी नवी दिल्लीचा विचार करण्यात आला होता. परंतु लॉजिस्टिकच्या चिंतेमुळे निर्णयात बदल करण्यात आला. अखेर FIDE ने गोव्याची निश्चिती केली. गोव्यात आठ फेऱ्यांच्या नॉकआउट सामन्यांमध्ये भाग घेऊन एकूण २०६ सहभागी दोन दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची बक्षीस रक्कम जिंकण्याचा प्रयत्न करताना दिसणार  आहेत. ही स्पर्धा जिंका किंवा घरी जा या पद्धतीने खेळवली जाणार आहे. ज्यामुळे विश्वचषक हा सर्वात रोमांचक क्रीडा स्पर्धांपैकी एक बनला आहे.

पहिल्या फेरीतून अव्वल ५० मानांकित खेळाडूंना वगळण्यात येणार असून उर्वरित खेळाडू पहिल्या फेरीपासून त्यांची मोहीम सुरू करणार आहेत. प्रत्येक सामना दोन क्लासिकल गेमवर आधारित असणार आहे. जर निकल लागू शकला नाही, तर टाय-ब्रेकरसाठी रॅपिड आणि ब्लिट्झ सामने खेळवण्यात येतील.  बक्षीस रक्कम आणि जेतेपदांव्यतिरिक्त, विश्वचषकात बरेच काही पणाला लावले जाणार आहे. शीर्ष तीन खेळाडू २०२६ कॅंडिडेट स्पर्धेसाठी पात्र ठरतील, जे जागतिक अजिंक्यपदाच्या मुकुटासाठी प्रमुख दावेदार ठरवले जाणार.

हेही वाचा : Asia cup 2025 : ‘तो टीम इंडियात परतणार नाही…’, श्रेयस अय्यरबद्दल प्रसिद्ध ज्योतिषाने केली मोठी भविष्यवाणी..

भारताने २००२ मध्ये हैदराबादमध्ये या स्पर्धेची दुसरी आवृत्तीचे आयोजन करण्यात आले होते. विश्वनाथन आनंदने २००० आणि २००२ मध्ये विश्वचषकाच्या पहिल्या दोन आवृत्यांमध्ये विजय मिळवला होता. त्याच वेळी, २०२३ मध्ये बाकू (अझरबैजान) येथे झालेल्या विश्वचषकामध्ये भारताचा आर. प्रज्ञानंद दुसऱ्या क्रमांकावर राहिला होता, तर नॉर्वेचा मॅग्नस कार्लसनने विजतेपद  मिळवले होते.  तथापि, पाच वेळा विजेता मॅग्नस कार्लसन यावेळी या प्रतिष्ठित स्पर्धेत भाग घेण्याची शक्यता कमी असल्याचे सांगण्यात येत आहे.

Web Title: Fide world cup 2025 to be held in goa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 27, 2025 | 12:58 PM

Topics:  

  • pm Nagendra Modi

संबंधित बातम्या

हिंदी भाषेच्या सक्तीला काँग्रेसचा विरोध; हर्षवर्धन सपकाळांची भाजपवर टीका
1

हिंदी भाषेच्या सक्तीला काँग्रेसचा विरोध; हर्षवर्धन सपकाळांची भाजपवर टीका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.