Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

FIFA World Cup 2026 मध्ये मोठा उलटफेर! अवघ्या 5 लाख लोकसंख्येच्या केप व्हर्डेची नॉकआऊटमध्ये धडक; आता अर्जेंटिनाचे आव्हान

Cape Verde Saudi Arabia Match Draw: केप व्हर्डेने इतिहास रचत पहिल्याच विश्वचषकात नॉकआऊट फेरी गाठली, तर दोन वेळच्या विश्वविजेत्या उरुग्वेचे आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आले. अवघ्या 5 लाख लोकसंख्येच्या केप व्हर्डेने स्पेनच्या विजयाचा फायदा घेत बाद फेरीत धडक मारत नवा विक्रम आपल्या नावावर केला.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jun 27, 2026 | 01:31 PM
photo- social media

photo- social media

Follow Us
Follow Us:
  • FIFA World Cup 2026 मध्ये मोठा उलटफेर
  • केप व्हर्डेची नॉकआऊटमध्ये धडक
  • आता अर्जेंटिनाचे आव्हान
फिफा विश्वचषक २०२६ मध्ये ( FIFA World Cup 2026) मोठा उलटफेर पाहायला मिळाला आहे. दोन वेळेची वर्ल्ड चॅम्पियन उरु्ग्वेचा प्रवास संपुष्टात आला आहे. तर आपला पहिलाच विश्वचषक खेळणाऱ्या केप व्हर्डेने राऊंड ऑफ ३२ मध्ये पोहचून इतिहास रचला आहे. शनिवारी (२७ जून) एस्तादियो ग्वादालहारा येथे झालेल्या गट ‘एच’च्या निर्णायक सामन्यात, ॲलेक्स बाएनाने पहिल्या सत्रात केलेल्या गोलच्या जोरावर स्पेनने उरुग्वेचा १-० ने पराभव केला. या पराभवामुळे उरुग्वे बाद फेरीच्या स्पर्धेतून बाहेर पडला. तर, दुसरीकडे शनिवारी खेळल्या गेलेल्या त्याच गटातील दुसऱ्या रोमांचक सामन्यात, केप व्हर्डेने सौदी अरेबियाविरुद्धचा सामना ०-० ने ड्र्रॉ केला. स्पेनने उरुग्वेला १-० ने पराभूत केल्यामुळे, केप व्हर्डे आपल्या गटात दुसऱ्या स्थानावर कायम आहे. केप व्हर्डे आता नॉकआऊट फेरी गाठणारा सर्वात लहान देश ठरला आहे.

Siuuu… CR7 इज Back; उझबेकिस्तानविरुद्ध गोल करत ख्रिस्तियानो रोनाल्डोचा FIFA World Cup 2026 मध्ये नवा जागतिक विक्रम

आता केप व्हर्डेचा सामना अर्जेंटिनाशी होईल

केवळ ५ लाख लोकसंख्या असलेल्या या लहान देशाने, आपल्या गटातील तिन्ही सामने अपराजित राहून इतिहास रचला आहे. आता, ३२ संघांच्या फेरीत केप व्हर्डेसमोर आणखी एक मोठे आव्हान आहे. त्यांचा पुढील सामना ४ जुलै रोजी गतविजेत्या अर्जेंटिनाशी मियामी येथे होणार आहे. दोन्ही संघांमध्ये तशी खरी स्पर्धा नसली तरी, अर्जेंटिना हा खूपच मोटा संघ आहे. परंतु, केप व्हर्डेसाठी इतिहासात आपले नाव कोरण्याची ही एक उत्तम संधी आहे. हा संघ आणखी एक अनपेक्षित विजय मिळवून अव्वल १६ संघांमध्ये आपले स्थान निश्चित करण्याचा प्रयत्न करेल.

४० वर्षीय गोलकीपर वोझिन्हाची चमकदार कामगिरी

केप व्हर्डेच्या ऐतिहासिक कामगिरीचा सर्वात मोठा नायक त्यांचा ४० वर्षीय गोलकीपर, वोझिन्हा होता. सौदी अरेबियाविरुद्धच्या सामन्यात, वोझिन्हाने तीन आश्चर्यकारक बचाव केले, ज्यामुळे सौदी अरेबिया थक्क झाला . पहिल्या हाफच्या स्टॉपेज टाइममध्ये, त्याने मोहम्मद कानोचा एक शानदार हेडर अडवून सौदी अरेबियाला आघाडी घेण्यापासून रोखले. त्यानंतर, दुसऱ्या हाफमध्ये, त्याने उडी मारून मोहम्मद अबू अल-शमातचा एक धोकादायक शॉट अडवला. ९२ व्या मिनिटाला, वोझिन्हाने अब्दुल्ला अल-हमदानचा एक अचूक शॉट देखील अडवला आणि आपल्या संघाचे नॉकआऊटमधील स्थान निश्चित केले.

Spain’s victory secures their place in the knockouts! 💪#FIFAWorldCup — FIFA World Cup (@FIFAWorldCup) June 27, 2026

केप व्हर्डेची अपराजित कामगिरी

आपला पहिला फिफा विश्वचषक खेळणाऱ्या केप व्हर्डेने एकही सामना न गमावता अपराजित राहून बाद फेरीतील आपले स्थान निश्चित केले. आपल्या पहिल्या सामन्यात, केप व्हर्डे २०१० विश्वचषक विजेत्या स्पेनला ०-० ने सामना ड्रॉ करुन खळबळ उडवून दिली. त्यानंतर, दुसऱ्या सामन्यात, त्यांनी दमदार पुनरागमन करत दोन वेळच्या विजेत्या उरुग्वेविरुद्ध २-२ असा रोमांचक ड्रॉ केला. आता, सौदी अरेबियाला ०-० अशा बरोबरीत रोखून, या संघाने ३ गुणांसह गटात दुसरे स्थान मिळवले, तर स्पेनने उरुग्वेला हरवून गटात अव्वल स्थान पटकावले.

FIFA World Cup 2026 दरम्यान ‘या’ दिग्गज खेळाडूने घेतला संन्यास; वर्ल्ड रेकॉर्डसह कारकिर्दीला दिला पूर्णविराम

Web Title: Fifa world cup 2026 cape verde draw saudi arabia match upset knockout argentina match

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 27, 2026 | 01:30 PM

Topics:  

  • Fifa
  • Fifa World Cup
  • Football Match
  • Football Tournament

संबंधित बातम्या

FIFA World Cup 2026 दरम्यान ‘या’ दिग्गज खेळाडूने घेतला संन्यास; वर्ल्ड रेकॉर्डसह कारकिर्दीला दिला पूर्णविराम
1

FIFA World Cup 2026 दरम्यान ‘या’ दिग्गज खेळाडूने घेतला संन्यास; वर्ल्ड रेकॉर्डसह कारकिर्दीला दिला पूर्णविराम

डिफेंडर्सची झोप उडवणारा Erling Holland; ‘या’ भारतीय पदार्थांचा शौकीन; चाहते झाले खुश
2

डिफेंडर्सची झोप उडवणारा Erling Holland; ‘या’ भारतीय पदार्थांचा शौकीन; चाहते झाले खुश

Fifa World Cup 2026: सर्वात मोठा उलटफेर, 4 वेळा चँपियन जर्मनीला इक्वाडोरने चिरडले, राष्ट्रपतीने जाहीर केला National Holiday
3

Fifa World Cup 2026: सर्वात मोठा उलटफेर, 4 वेळा चँपियन जर्मनीला इक्वाडोरने चिरडले, राष्ट्रपतीने जाहीर केला National Holiday

Sports Commentary Career: खेळाची आवड आहे? स्पोर्ट्स कमेंटेटर बनून क्रीडा क्षेत्रात कमवा नाव; ‘हे’ कोर्सेस पडतील उपयोगी
4

Sports Commentary Career: खेळाची आवड आहे? स्पोर्ट्स कमेंटेटर बनून क्रीडा क्षेत्रात कमवा नाव; ‘हे’ कोर्सेस पडतील उपयोगी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.