Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

FIFA World Cup 2026: मेस्सी, एम्बाप्पे की हालांड? गोल्डन बूटच्या शर्यतीत कोण आघाडीवर?

Messi, mbappe haaland in world cup golden boot race: फिफा विश्वचषका स्पर्धेत आता क्वार्टरफायनलचे सामने खेळले जाणार आहे. त्यासोबतच गोल्डन बूटच्या शर्यतीत मेस्सी, एम्बाप्पे आणि हालांड यांच्यात चुरशीची भिडत पाहायला मिळत आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 09, 2026 | 04:52 PM
FIFA World Cup 2026: मेस्सी, एम्बाप्पे की हालांड? गोल्डन बूटच्या शर्यतीत कोण आघाडीवर?
Follow Us
Follow Us:
  • गोल्डन बूटच्या शर्यतीत तीन सुपरस्टार
  • गोल्डन बूटच्या शर्यतीत कोण आघाडीवर?
  • मेस्सीने अजूनही जिंकले नाही गोल्डन बूट
फिफा विश्वचषक २०२६ ( FIFA World Cup 2026) स्पर्धा आता सर्वात रोमांचक आणि निर्णायक टप्प्यावर पोहोचली आहे. प्रथमच या स्पर्धेत ४८ संघानी भाग घेतला होता. यापैकी ४० संघाचा प्रवास संपला आहे तर फक्त ८ संघ विजेतेपदाच्या शर्यतीत कायम आहेत. ट्रॉफीच्या रेससोबतच गोल्डन बूट पुरस्कारासाठीची शर्यतही रंगली आहे. किलियन एमबाप्पे, लिओनेल मेस्सी आणि अर्लिंग हालंड यांच्यात हा पुरस्कार जिंकण्यासाठी तीव्र स्पर्धा सुरू आहे. सध्या अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सी या शर्यतीत आघाडीवर आहे. त्यामुळे गोल्डन बूटसाठीची शर्यत खूपच रोमांचक झाली आहे. सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूला गोल्डन बूट तर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावरील खेळाडूंना सिल्व्हर आणि ब्राँझ बूट पुरस्ताक दिले जातात.

Abhishek Sharma ची दिल्ली हायकोर्टात धाव; परवानगीशिवाय नाव-फोटो वापरल्याने वाद, ॲमेझॉन-फ्लिपकार्ट अडचणीत

गोल्डन बूटच्या शर्यतीत कोण आघाडीवर?

अर्जेंटिनाचा लिओनेल मेस्सी सध्या आठ गोल आणि एका असिस्टसह या यादीत अव्वल स्थानी आहे. फ्रान्सचा किलियन एमबाप्पे सात गोल आणि दोन असिस्टसह दुसऱ्या स्थानी आहे. नॉर्वेचा अर्लिंग हालंड तिसऱ्या स्थानावर असून त्यानेही सात गोल केले आहेत. जर दोन किंवा अधिक खेळाडूंचे गोल समान असतील, तर विजेता असिस्टच्या संख्येनुसार ठरवला जातो. इंग्लंडचा कर्णधार हॅरी केन सहा गोलांसह चौथ्या स्थानी आहे. उपांत्यपूर्व फेरीत, हे तिन्ही खेळाडू आपल्या संघांना उपांत्य फेरीत पोहोचवण्यावर लक्ष केंद्रित करतीलच, पण त्याचबरोबर गोल करून शर्यतीत टिकून राहण्याचाही प्रयत्न करतील.

मेस्सीने आतापर्यंत ८ गोल केले

अर्जेंटिनाने इजिप्तविरुद्धच्या मागील सामन्यात २-० ने पिछाडीवर असूनही, शेवटच्या क्षणी एक दमदार पुनरागमन करत ३-२ असा विजय मिळवला आणि उपांत्यपूर्व फेरीत आपले स्थान निश्चित केले. लिओनेल मेस्सीचा तिसरा गोल अर्जेंटिनाच्या विजयात निर्णायक ठरला. या गोलमुळे त्याने स्पर्धेच्या गोल्डन बूटच्या शर्यतीत पुन्हा आघाडी घेतली आहे.

मेस्सीने अजूनही जिंकले नाही गोल्डन बूट

फुटबॉल जगतातील सर्वश्रेष्ठ खेळाडूंपैकी एक मानल्या जाणाऱ्या लिओनेल मेस्सीला अद्याप गोल्डन बूट जिंकता आलेला नाही. २०२२ च्या मागील विश्वचषकात, मेस्सीने सात गोल करून दुसरे स्थान पटकावले होते. तर दुसरीकडे,किलियन एम्बाप्पेने कतारमध्ये २०२२ च्या फिफा विश्वचषक स्पर्धेत आठ गोलांसह हा पुरस्कार जिंकला. हॅरी केनने २०१८ मध्ये सहा गोलांसह हा पुरस्कार जिंकला होता आणि कोलंबियाच्या जेम्स रॉड्रिग्जनेही २०१४ मध्ये सहा गोलांसह गोल्डन बूट जिंकला होता. त्यामुळे, या वर्षी लिओनेल मेस्सीला हा पुरस्कार जिंकण्याची मोठी संधी आहे.

मालिका आणि अब्रू दोन्ही पणाला! श्रेयस अय्यरच्या कर्णधारपदाला लागला पराभवाचा शाप? ‘या’ लाजिरवाण्या आकड्यांनी वाढवली चिंता

Web Title: Fifa world cup 2026 golden boot race messi mbappe haaland

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2026 | 04:51 PM

Topics:  

  • Fifa World Cup
  • Football Tournament
  • Lionel Messi

संबंधित बातम्या

Cristiano Ronaldo Retirement: एका युगाचा अंत होणार? ‘कदाचित हे माझं शेवटचं…’; ख्रिस्तियानो रोनाल्डो मोठ्या निर्णयाच्या तयारीत
1

Cristiano Ronaldo Retirement: एका युगाचा अंत होणार? ‘कदाचित हे माझं शेवटचं…’; ख्रिस्तियानो रोनाल्डो मोठ्या निर्णयाच्या तयारीत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.