अभिषेक शर्मा यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वकिलाने सांगितले की, अद्याप न हटवण्यात आलेल्या URL युआरएलचा तपशील देणारे एक अतिरिक्त प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले आहे. शर्मा यांच्या वकिलाने सांगितले की, काही पोस्ट आधीच काढण्यात आल्या असल्या तरी, फेसबुक आणि इंस्टाग्रामवरील दोन पोस्ट आणि आणखी एक पोस्ट, ज्यात अपमानास्पद भाषा होती, त्या अद्याप काढण्यात आलेल्या नाहीत.
ते पुढे म्हणाले की, ‘फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉनने अभिषेक शर्मा यांचा फोटो त्यांच्या परवानगीशिवाय व्यावसायिक कारणांसाठी वापरला आहे, जो हटवण्यात आला पाहिजे.’ मेटाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वकिलाने सांगितले की, दोन्ही सोशल मीडिया पोस्ट काढल्या जातील, तर ॲमेझॉनच्या वकिलाने सांगितले की, ते न्यायालयाच्या आदेशाचे पालन करतील आणि अभिषेक शर्मा यांचा फोटो त्यांच्या परवानगीशिवाय वापरणाऱ्या युआरएल काढून टाकतील.
दिल्ली उच्च न्यायालयाने सांगितले की, ‘क्रिकेटपटू अभिषेक शर्माच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि प्रतिमेचा गैरवापर करणाऱ्या अनेक आक्षेपार्ह पोस्ट आणि लिंक्स हटवण्याचे निर्देश देणारा अंतरिम आदेश जारी केला जाईल.’
दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केलेल्या आपल्या याचिकेत, अभिषेक शर्माने आपल्या व्यक्तिमत्व हक्कांच्या संरक्षणाची मागणी केली आहे. तसेच, त्याला बदनाम करण्यासाठी तयार करण्यात आलेली कथित आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आधारित सामग्री काढून टाकण्याची मागणीही त्याने केली आहे.
इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या टी-२० मालिकेत अभिषेक शर्माची बॅट चांगलीच तळपली आहे, पण त्याला अद्याप मोठा स्कोअर करता आला नाही. आता टीम इंडियाकडे ही मालिका अनिर्णित राखण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, त्यामुळे चौथ्या टी-२० सामन्यात अभिषेक शर्माची कामगिरी निर्णायक ठरेल. भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी-२० मालिकेचा चौथा सामना ब्रिस्टल येथील काउंटी ग्राऊंडवर भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री १०:०० वाजता सुरू होईल.






