Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

FIFA World Cup 2026: विश्वचषकाची रंगत वाढली; मेस्सी -रोनाल्डो कधी उतरणार मैदानात? अर्जेंटिना-पोर्तुगालचा पहिला सामना कधी?

Lionel Messi Christiano Ronaldo first Match in FIFA 2026: फिफा विश्वचषक २०२६ ची सुरुवात उत्साहात झाली असून उद्घाटन सामन्यात मेक्सिकोने दक्षिण आफ्रिकेला तर दक्षिण कोरियाने चेक रिपब्लिकला पराभूत केले. आता सर्वांचे लक्ष लिओनेल मेस्सी आणि क्रिस्टियानो रोनाल्डो यांच्या अर्जेंटिना आणि पोर्तुगाल संघांच्या पहिल्या सामन्यांकडे लागले आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jun 12, 2026 | 03:57 PM
FIFA World Cup 2026: विश्वचषकाची रंगत वाढली; मेस्सी -रोनाल्डो कधी उतरणार मैदानात? अर्जेंटिना-पोर्तुगालचा पहिला सामना कधी?
Follow Us
Follow Us:
  • विश्वचषकाची रंगत वाढली
  • मेस्सी -रोनाल्डो कधी उतरणार मैदानात?
  • अर्जेंटिना-पोर्तुगालचा पहिला सामना कधी?
फिफा विश्वचषक २०२६ ( FIFA World Cup 2026) ची शानदार सुरुवात झाली आहे. स्पर्धेच्या उद्घाटन सामन्यात मेक्सिकोने दक्षिण आफ्रिकेला २-० ने पराभूत केले, तर दुसऱ्या सामन्यात दक्षिण कोरियाने चेक रिपब्लिकला २-१ ने हरवून विश्वचषकाची विजयी सुरुवात केली. या वर्षीच्या विश्वचषकात एकूण ४८ संघ सहभागी झाले असून, त्यांची प्रत्येकी चार संघांच्या १२ गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत, जगभरातील फुटबॉलप्रेमींचे लक्ष आता अर्जेंटिना आणि पोर्तुगालच्या पहिल्या सामन्यांकडे लागले आहे. मेस्सी आणि रोनाल्डो यांच्यासाठी हा अखेरचा विश्वचषक ठरू शकतो, त्यामुळे चाहते लिओनेल मेस्सी आणि क्रिस्टियानो रोनाल्डो यांना मैदानात पाहण्यासाठी उत्सुक आहेत. या दोन्ही संगाचा पहिला सामना कधी अन् केव्हा खेळला जाईल, जाणून घेऊयात.

IND Vs AFG ODI: रोहित शर्मा कमबॅकसाठी सज्ज! भारत-अफगाणिस्तान आमनेसामने; पहा पिच रिपोर्ट अन् प्लेइंग ११

मेस्सीचा पहिला सामना अल्जेरिया विरुद्ध

गतविजेता अर्जेंटिना संघाला ‘जे’ गटात स्थान मिळाले आहे. लिओनेल मेस्सीचा संघ आपल्या मोहिमेची सुरुवात १६ जून रोजी करणार आहे. या गटात अर्जेंटिनासोबत जॉर्डन, ऑस्ट्रिया आणि अल्जेरिया हे संघ आहेत. १७ जून रोजी अर्जेंटिनाचा सामना अल्जेरियाशी होईल, तेव्हा मेस्सी पहिल्यांदाच मैदानात उतरेल. हा सामना अमेरिकेतील ॲरोहेड स्टेडियमवर खेळला जाईल. अर्जेंटिनाचा पुढील सामना २२ जून रोजी ऑस्ट्रियाविरुद्ध, तर गटातील शेवटचा सामना २८ जून रोजी जॉर्डनविरुद्ध होईल. मेस्सीच्या नेतृत्वाखालील अर्जेंटिना संघ पुन्हा एकदा विजेतेपदाच्या शर्यतीत प्रबळ दावेदार मानला जात आहे. अर्जेंटिनाने २०२२ मध्ये कतार फिफा विश्वचषक जिंकाल होता.

डीआर काँगोविरुद्ध मैदानात उतरणार रोनाल्डो

क्रिस्टियानो रोनाल्डोच्या पोर्तुगाल संघाला ‘क’ गटात स्थान देण्यात आले आहे. या गटात पोर्तुगालसोबत कोलंबिया, उझबेकिस्तान आणि डीआर काँगो हे संघ आहेत. पोर्तुगालचा पहिला सामना १७ जून रोजी अमेरिकेतील ह्यूस्टन येथे डीआर काँगोविरुद्ध होईल. त्यानंतर २३ जून रोजी पोर्तुगालचा सामना उझबेकिस्तानशी होईल. २८ जून रोजी पोर्तुगालचा सामना कोलंबियाशी होईल. रोनाल्डोच्या नेतृत्वाखाली पोर्तुगाल संघाकडे अनेक दर्जेदार खेळाडू आहेत. युरोपियन फुटबॉलमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या या संघाकडून विश्वचषकातही मोठ्या अपेक्षा आहेत. यावेळी, रोनाल्डोकडे आणखी एक ऐतिहासिक विक्रम नोंदवण्याची संधी असणार आहे.

अर्जेंटिना तीन वेळा विश्वविजेता ठरला असून, त्यांनी १९७८, १९८६ आणि २०२२ मध्ये ट्रॉफी जिंकली आहे. दुसरीकडे, पोर्तुगालने आजपर्यंत विश्वचषक जिंकलेला नाही. त्यांची सर्वोत्तम विश्वचषक कामगिरी १९६६ मध्ये झाली, जेव्हा ते तिसऱ्या स्थानावर राहिले होते.

यंदाच्या विश्वचशकात काय खास

  • FIFA World Cup 2026 मध्ये विक्रमी 48 संघ सहभागी होत आहेत.
  • स्पर्धेचे सामने अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको येथे खेळवले जात आहेत.
  • मेस्सी आणि रोनाल्डो यांच्या कामगिरीकडे संपूर्ण जगाचे लक्ष असेल.
  • दोन्ही दिग्गज खेळाडूंसाठी हा शेवटचा विश्वचषक ठरण्याची शक्यता आहे.
ICC Women’s T20 World Cup 2026: आजपासून विश्वचषकाचा थरार! टीम इंडियाचे पहिले आव्हान कोणते?

Web Title: Fifa world cup 2026 messi ronaldo argentina portugal schedule first match

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 12, 2026 | 03:57 PM

Topics:  

  • Cristiano Ronaldo
  • Fifa World Cup
  • Football Tournament
  • Lionel Messi

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.