Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 26 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

FIFA World Cup 2026 Semi Finals: ट्रॉफीच्या शर्यतीत आता फक्त ४ संघ! सेमिफायनलचा थरार रंगणार; पाहा संपूर्ण शेड्यूल

FIFA World Cup Semi Final schedule: फिफा विश्वचषक २०२६ स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीतील सामने पूर्ण झाले आहेत. यासह सेमिफायनलचे चित्र देखील स्पष्ट झाले आहे. कोणते संघ आमनेसामने येणार, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 12, 2026 | 05:37 PM
FIFA World Cup 2026 Semi Finals: ट्रॉफीच्या शर्यतीत आता फक्त ४ संघ! सेमिफायनलचा थरार रंगणार; पाहा संपूर्ण शेड्यूल
Follow Us
Follow Us:
  • ट्रॉफीच्या शर्यतीत आता फक्त ४ संघ
  • सेमिफायनलचा थरार रंगणार
  • पाहा संपूर्ण वेळापत्रक
फिफा विश्वचषक २०२६ च्या उपांत्यपूर्व फेरीतील शेवटचे दोन सामने १२ जुलै रोजी खेळले गेले. पहिलया सामन्यात इंग्लंडने नॉर्वेचा २-१ ने जिंकून उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले. दुसऱ्या सामन्यात अर्जेंटिनाने स्वित्झर्लंडवर ३-१ ने विजय मिळवून सेमिफायनलचे तिकीट मिळवले. यासह, फिफा विश्वचषक २०२६ मध्ये उपांत्य फेरीत पोहोचणाऱ्या चार संघांची नावे निश्चित झाली आहेत. पहिला उपांत्य फेरीचा सामना १५ जुलै रोजी तर दुसरा उपांत्य फेरीचा सामना १६ जुलै रोजी अर्जेंटिना खेळला जाईल.

BCCI चा मोठा निर्णय! इंग्लंड आणि झिम्बाब्वे मालिकेतून हर्षित राणा-वरुण चक्रवर्ती बाहेर; नेमकं कारण काय?

फ्रान्स, इंग्लंड, अर्जेंटिना आणि स्पेन यांनी फिफा विश्वचषक २०२६ च्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. १२ जुलै रोजी झालेल्या उपांत्यपूर्व फेरीतील सामन्यात इंग्लंडने नॉर्वेला २-१ ने पराभूत केले. तर अर्जेंटिनाने स्वित्झर्लंडला ३-१ ने हरवले. यापूर्वी शुक्रवारी, फ्रान्सने उपांत्यपूर्व फेरीत मोरोक्कोचा २-० ने पराभव केला. शनिवारी ११ जुलै रोजी स्पेनने बेल्जियमवर २-१ ने विजय मिळवला.

पहिल्या सेमिफायनलमध्ये कोण भिडणार?

फिफा विश्वचषक २०२६ चा पहिला उपांत्य सामना फ्रान्स आणि स्पेन यांच्यात होणार आहे. एका बाजूला किलियन एम्बाप्पे आणि दुसऱ्या बाजूला लॅमिन यमाल असतील. हा सामना १५ जुलै रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री १२:३० वाजता सुरू होईल. स्पेन विरुद्ध फ्रान्स हा सामना अमेरिकेतील टेक्सास राज्यातील अर्लिंग्टन येथील एटी अँड टी स्टेडियमवर खेळला जाईल. स्पेन आणि फ्रान्स यांच्यात एकूण ३८ सामने खेळले गेले आहेत, ज्यात स्पेनने १८, तर फ्रान्सने केवळ १३ सामने जिंकले असून सात सामने अनिर्णित राहिले आहेत.

दुसऱ्या सेमिफायनमध्ये कोण भिडणार?

फिफा विश्वचषकाचा दुसरा उपांत्य सामना इंग्लंड आणि अर्जेंटिना यांच्यात खेळला जाईल. हा सामना १६ जुलै रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार मध्यरात्री १२:३० वाजता सुरू होईल. इंग्लंड विरुद्ध अर्जेंटिना हा सामना अमेरिकेतील अटलांटा येथील मर्सिडीज-बेंझ स्टेडियमवर खेळला जाईल. विश्वचषकात अर्जेंटिना आणि इंग्लंड यांच्यात आतापर्यंत पाच सामने झाले असून, त्यापैकी इंग्लंडने तीन आणि अर्जेंटिनाने दोन सामने जिंकले आहेत.

अंतिम सामना कधी?

फिफा विश्वचषक २०२६ चा अंतिम सामना २० जुलै रोजी मध्यरात्री १२:३० खेळला जाणार आहे. त्यापूर्वी, दोन्ही उपांत्य फेरीतील पराभूत संघ १९ जुलै रोजी तिसऱ्या स्थानासाठीचा सामना खेळतील, जो भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी २:३० वाजता सुरू होईल.

Norway vs England: बेलिंगहॅमचा डबल धमाका! नॉर्वेवर मात करत इंग्लंडची सेमिफायनलमध्ये दमदार एन्ट्री

Web Title: Fifa world cup 2026 semi final schedule france vs spain england vs argentina india time

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 12, 2026 | 05:37 PM

Topics:  

  • Fifa World Cup
  • Footbaal
  • Lionel Messi

संबंधित बातम्या

Nagpur News : नागपूरचा फ़ुटबाँल , पुढची वाट कुठे ;नागपुरी फ़ुटबाँल चे भविष्य काय ?
1

Nagpur News : नागपूरचा फ़ुटबाँल , पुढची वाट कुठे ;नागपुरी फ़ुटबाँल चे भविष्य काय ?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.