Norway vs England: बेलिंगहॅमचा डबल धमाका! नॉर्वेवर मात करत इंग्लंडची सेमिफायनलमध्ये दमदार एन्ट्री
बीसीसीआयने सांगितले की, ट्रेंट ब्रिज येथे इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यादरम्यान हर्षितला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली. तो इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून बाहेर झाला असून पुढील उपचारांसाठी बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये (CoE) दाखल होईल. दुसरीकडे, वरुण चक्रवर्ती तिसऱ्या टी-२० सामन्यादरम्यान जखमी झाला. त्याच्या एमआरआयमध्ये ग्रेड २ हॅमस्ट्रिंगची दुखापत असल्याचे समोर आले आहे. वैद्यकीय सल्ल्यानुसार, वरुण झिम्बाब्वेविरुद्धच्या टी-२० मालिकेतून बाहेर झाला आहे. तो देखील बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये (CoE) दाखल होईल.
इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत भारतीय संघाला ०-४ असा पराभव पत्करावा लागला होता. आता, भारतीय संघ तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत कमबॅक करण्याचे प्रयत्न करेल. या एकदिवसीय मालिकेत रोहित शर्मा आणि विराट कोहलीची जोडी खेळताना पाहायला मिळणार आहे. यानंतर, २३ जुलैपासून भारतीय संघ झिम्बाब्वेचा दौरा करेल, जिथे तीन टी-२० सामने खेळले जातील.
झिम्बाब्वेविरुद्धच्या T20I मालिकेसाठी अपडेटेड भारतीय संघ: श्रेयस अय्यर (कर्णधार), वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा (उपकर्णधार), ईशान किशन (विकेटकीपर), शिवम दुबे, सूर्यांश शेडगे, रिंकू सिंग, हर्ष दुबे, प्रिन्स यादव, अशोक शर्मा,प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर), रवी बिश्नोई.
Wimbledon 2026: लिंडा नोस्कोवा ठरली चॅम्पियन! पहिल्याच ग्रँड स्लॅम विजेतेपदावर कोरले नाव






