
photo- social media
टीम इंडियात मोठी उलथापालथ? सलग पराभवानंतर प्रशिक्षक देणार राजीनामा? BCCI मोठी कारवाई करणार
स्पेन आणि बेल्जियम यांच्यातील उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या, ज्यात दोन्ही संघांनी पहिल्या सत्रात आक्रमक खेळ केला. स्पेनच्या फॅबियन रुईझने सामन्याच्या ३० व्या मिनिटाला एक शानदार गोल करून आपल्या संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर, बेल्जियमच्या खेळाडूंवर दबाव दिसत होता,परंतु बेल्जियमच्या चार्ल्स डी केटेलेअरने ४१ व्या मिनिटाला एक शानदार हेडर मारून सामना १-१ असा बरोबरीत आणला. यासोबतच, स्पेनचा गोलरकीपर सिमिओनीचा ५६० मिनिटे एकही गोल न होऊ देण्याचा विक्रमही संपुष्टात आला.
सामन्याच्या ७१ व्या मिनिटाला बेल्जियमला मोठा धक्का बसला. जेव्हा त्यांचा स्टार गोलकीपर थिबॉ कोर्तुआ दुखापतग्रस्त होऊन मैदानाबाहेर गेला. त्याच्या जागी साने लॅमेन्स मैदानात आला. फिफा विश्वचषकातील हा त्याचा २१ वा सामना होता . यासह, तो जर्मनीच्या मॅन्युएल न्युअर (२३ सामने) नंतर विश्वचषकातील गोलकीपरच्या यादीत दुसरा सर्वाधिक सामने खेळलेला गोलकीपर बनला आहे.
पहिला हाफ १-१ असा बरोबरीत संपल्यानंतर, दुसऱ्या हाफच्या ८७ व्या मिनिटापर्यंत एकही गोल झाला नाही, त्यामुळे सामना पेनल्टी शूट-आऊटमध्ये जाईल असे सर्वांना वाटले. पण स्पेनच्या मिकेल मेरिनोने ८८ व्या मिनिटाला गोलपोस्टजवळ पोहोचून एका जोरदार शॉटने गोल केला आणि स्पेनचे उपांत्य फेरीतील तिकीट निश्चित केले. सामन्याच्या अखेरीस स्पेनने आपली २-१ अशी आघाडी कायम ठेवली. आता स्पेनचा सामना उपांत्य फेरीत, भारतीय वेळेनुसार १५ जुलै रोजी मध्यरात्री १२:३० वाजता, २०२२ विश्वचषक उपविजेत्या फ्रान्सशी होईल.