Team India ची घसरण ऑलिम्पिकच्या मार्गात अडथळा ठरणार? 2028 पात्रतेचे कसे असणार समीकरण?
साउथहॅम्प्टन येथील रोझ बाऊल मैदानाची खेळपट्टीवर आतापर्यंत फलंदाजांचेच वर्चस्व राहिले आहे. त्यामुळे ही खेळपट्टी फलंदाजांसाठी फायदेशीर मानली जाते. चांगल्या बाउन्समुळे चेंडू सहजपणे बॅटवर येतो. या मैदानावर पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या १६६ आहे, तर दुसऱ्या डावातील सरासरी धावसंख्या १३८ आहे. त्यामुळे, या सामन्यात नाणेफेक महत्त्वाची भूमिका बजावू शकते. येथे खेळल्या गेलेल्या २४ टी२० सामन्यांपैकी, प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने १६ सामने जिंकले आहेत, तर पाठलाग करणाऱ्या संघाने ८ सामने जिंकले आहेत. भारतीय संघाने २०२२ मध्ये या मैदानावर एकच टी२० सामना खेळला आहे. या सामन्यात, टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करून १९८ धावा केल्या, तर पाठलाग करताना इंग्लंड संघाला १४८ धावांवर रोखण्यात आले आणि टीम इंडियाने हा सामना ५० धावांनी जिंकला.
AccuWeather नुसार, शनिवारी साउथहॅम्प्टनमध्ये येथील तापमान २१ अंश सेल्सियस राहण्याची शक्यता आहे. तसेच, पावसाची कोणतीही शक्यता नाही, त्यामुळे प्रेक्षकांना संपूर्ण ४० षटकांचा सामना पाहायला मिळेल.
भारतीय संघ मालिका आधीच हरली असून, आता त्यांच्यासमोर ४-० असा लाजिरवाणा पराभव टाळण्याचे आव्हान आहे. दुसरीकडे, इंग्लंड केवळ क्लीन स्वीपच नव्हे, तर विश्वविजेत्या भारताला मागे टाकून आयसीसी टी-२० क्रमवारीत अव्वल स्थानी पोहोचण्याच्या उंबरठ्यावर आहे. त्यामुळे, हा सामना दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.
भारत: वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, ईशान किशन (विकेटकीपर), श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा/संजू सॅमसन, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, प्रसिद्ध कृष्णा, प्रिन्स यादव, अर्शदीप सिंग.
इंग्लंड: फिल सॉल्ट, जोस बटलर (विकेटकीपर), जेकब बेथेल, हॅरी ब्रुक (कर्णधार), टॉम बँटन, विल जॅक्स, सॅम करन, जोफ्रा आर्चर, जोश टंग, आदिल रशीद, रेहान अहमद.






