Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

PSL 2025 : पाकिस्तानात PSL 2025 स्पर्धेला गालबोट! पहिल्या सामन्यापूर्वीच इस्लामाबादच्या टीम हॉटेलमध्ये अग्नीतांडव

किस्तान सुपर लीग २०२५ ची सुरुवात काल शुक्रवार, ११ एप्रिल रोजी सुरवात झाली आहे. परंतु, पहिल्या सामन्यापूर्वीच पाकिस्तानातील इस्लामाबादमध्ये एक मोठा अपघात होऊन हॉटेलला आग लागली.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Apr 12, 2025 | 02:00 PM
PSL 2025: PSL 2025 tournament in Pakistan is in trouble! Fire breaks out at team hotel in Islamabad before first match

PSL 2025: PSL 2025 tournament in Pakistan is in trouble! Fire breaks out at team hotel in Islamabad before first match

Follow Us
Close
Follow Us:

PSL 2025 : पाकिस्तान सुपर लीग २०२५ ची सुरुवात काल शुक्रवार, ११ एप्रिल रोजी झाली आहे. काल पहिला सामना इस्लामाबाद युनायटेड आणि लाहोर कलंदर्स यांच्यात खेळवण्यात आला. रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर हा सामना पार पडला. इस्लामाबादने लाहोर कलंदर्सचा पराभव केला. मात्र, पीएसएल सुरू होण्यापूर्वीच या स्पर्धेला गालबोट लागले. पाकिस्तानातील इस्लामाबादमध्ये एक मोठा अपघात घडला.  इस्लामाबादमधील टीम हॉटेलमध्ये आग लागल्याची माहिती मिळत आहे. जिथे पीएसएलचे खेळाडू, अधिकारी आणि लीगशी संबंधित इतर सदस्य देखील वास्तव्यास होते.

हेही वाचा : CSK vs KKR: लाईव्ह शोमध्ये वीरेंद्र सेहवाग पुन्हा चर्चेत! CSK च्या जखमांवर तिखटाचा मारा.. पहा VIDEO

हॉटेलच्या सहाव्या मजल्यावर ही दुर्घटना घडली होती.  जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले की, आग वरच्या मजल्यावर लागली आणि अग्निशमन दल तत्काल घटनास्थळी हजर होऊन त्यांनी  परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. यामध्ये दिलासादायक बाब  अशी की, या  आगीमुळे कोणत्याही खेळाडूला किंवा अधिकाऱ्याला कोणत्याही प्रकारची दुखापत झालेली नाही, अथवा कुठला त्रास देखील झालेला नाही. सर्वांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले.

पीएसएलच्या सीईओंनी दिली माहिती

पीएसएलचे सीईओ असलेल्या सलमान नसीर यांनी सांगितले की ‘कोणत्याही खेळाडूला किंवा संघातील इतर कुणाला देखील कुठल्याच प्रकारची समस्या जाणवली नाही. आगीवर वेळेवर नियंत्रण मिळवण्यात आले. आग हॉटेलमध्ये पासरण्यापसून रोखण्यात आले.’  तसेच ते पुढे म्हणाले की, ‘अग्निशमन दलाच्या पथकांकडून आग विझवण्यासाठी ताबोडतोब प्रयत्न करण्यात येऊन, आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.’

अर्ध्या तासात आगीवर नियंत्रण

हॉटेलमध्ये लागलेली आग, अग्निशमन दलाकडून अवघ्या अर्ध्या तासात विझवण्यात आली आहे. सीडीएचे आपत्कालीन संचालक जफर इक्बाल यांनी दिलेल्या माहितीत त्यांनी म्हटले आहे की, ‘बचाव कार्यात सहा अग्निशमन इंजिन आणि ५० अग्निशमन दलाच्या जवानांनी सहभाग  भाग घेतला होता. त्यांच्या कठोर मेहनतीने अर्ध्या तासात आग विझवण्यात यश आले.’

हेही वाचा : IPL 2025 : दिल्लीच्या वादळाचे थैमान, ट्रेंट बोल्टला मैदान सोडून काढावा लागला पळ, ओरडत म्हणाला.. पहा Video

इस्लामाबादकडून लाहोर कलंदर्सचा धुव्वा

पाकिस्तानातील पीएसएल २०२५ चा पहिला सामना , इस्लामाबाद युनायटेड आणि लाहोर कलंदर्स यांच्यात खेळवण्यात आला. या  पहिल्या सामन्यात, इस्लामाबाद युनायटेडकडून नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेण्यात आला. अशा परिस्थितीत प्रथम फलंदाजी करणाऱ्या लाहोर कलंदर्सचा संघ १९.२ षटकांत सर्वबाद १३९ धावाच करू शकला. इस्लामाबादने युनायटेड संघाने हे लक्ष्य केवळ १७.४ षटकांमध्येच पूर्ण करून पीएसएल २०२५  स्पर्धेतील सलामीचा सामाना आपल्या नावे केला.

Web Title: Fire breaks out at islamabad team hotel ahead of first psl 2025 match in pakistan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 12, 2025 | 02:00 PM

Topics:  

  • Pakistan Cricket team
  • PSL 2025

संबंधित बातम्या

PAK vs BAN : पाकिस्तान क्रिकेट संघाला मोठा धक्का! बांगलादेशविरुद्धच्या मालिकेपूर्वी ‘हा’ धाकड गोलंदाज दुखापतग्रस्त 
1

PAK vs BAN : पाकिस्तान क्रिकेट संघाला मोठा धक्का! बांगलादेशविरुद्धच्या मालिकेपूर्वी ‘हा’ धाकड गोलंदाज दुखापतग्रस्त 

IND Vs ENG : गिल सेनेचा एजबॅस्टन विजय हेवा वाटणारा; पाकिस्तानचा कित्येक वर्ष जुना विक्रम उध्वस्त; वाचा सविस्तर
2

IND Vs ENG : गिल सेनेचा एजबॅस्टन विजय हेवा वाटणारा; पाकिस्तानचा कित्येक वर्ष जुना विक्रम उध्वस्त; वाचा सविस्तर

पाकिस्तानला मोठा झटका! आणखी एका प्रशिक्षकाचा संघाला टाटा, बाय-बाय; PCB चा वाद चव्हाट्यावर.. 
3

पाकिस्तानला मोठा झटका! आणखी एका प्रशिक्षकाचा संघाला टाटा, बाय-बाय; PCB चा वाद चव्हाट्यावर.. 

 PSL 2025 : भारताशी पंगा पाकिस्तानला पडला महागात! PSL 2025 ला आता गल्ली क्रिकेटचे स्वरूप… 
4

 PSL 2025 : भारताशी पंगा पाकिस्तानला पडला महागात! PSL 2025 ला आता गल्ली क्रिकेटचे स्वरूप… 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.