IPL 2025 : दिल्लीच्या वादळाचे थैमान, ट्रेंट बोल्टला मैदान सोडून काढावा लागला पळ, ओरडत म्हणाला..(फोटो-सोशल मीडिया)
IPL 2025 : आयपीएल 2025 चा 18 वा हंगाम चांगलाच बहरला आहे. गुणतालिका देखील हरकती दाखवता दिसून येत आहे. आता पर्यंत 25 सामने झाले असून संघामध्ये विजयाच्या दृष्टीने आखली जाता आहे. अशातच शुक्रवारी दिल्लीतील हवामान अचानक बदलेले दिसून आले. आणि अचानक शहरात धुळीचे वादळ सुरू झाले. तसेच जोरदार वारे वाहू लागले. यावेळी मुंबई इंडियन्सचे खेळाडू दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमच्या मैदानात सराव करत होते. जोरदार वादळामुळे स्टेडियममधील होर्डिंग्जही पडण्याचा धोका निर्माण झाला होता.त्यावेळी सर्व खेळाडू मैदानातून पळत जावे लागले.
इंडियन प्रीमियर लीगच्या १८ व्या हंगामातील पहिला सामना १३ एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स संघ शुक्रवारी सराव करण्यासाठी या स्टेडियममध्ये पोहोचले होते, परंतु काही वेळातच अचानक हवामान पूर्णपणे बदलून गेले आणि धुळीचे वादळ आले.
हेही वाचा : RCB vs DC : KL Rahul व्हाईट बॉल फॉरमॅटचा बनतोय राजा, आयपीएलमध्ये दमदार कामगिरी..
या हवामान बदलाचा परिणाम खेळाडूंच्या सरावावर देखील झाला. खेळाडूंना सराव मधोमध सोडून मैदानाबाहेर पळत जावे लागले. मुंबई इंडियन्सने त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर या घटनेचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये स्टेडियममध्ये लावलेले होर्डिंग्जही हवेत उडत असल्याचे दिसून येत आहेत. धुळीचे वादळ येत असल्याचे पाहून ट्रेंट बोल्ट ओरडत आणि वेगाने धावत मैदानाबाहेर पळत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे.
⚡️Thunderstorm in Delhi and ThunderBoult is on the run 🏃♂️#MumbaiIndians #PlayLikeMumbai #TATAIPL #DCvMI pic.twitter.com/IpK0MN0Scj
— Mumbai Indians (@mipaltan) April 11, 2025
रविवार, १३ एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स आमनेसामने येणारअ आहेत. अरुण जेटली स्टेडियमवर हा सामना खेळवण्यात येणार आहे. या मैदानावर या हंगामातील हा पहिलाच सामना असणार आहे. शुक्रवारी शहरात धुळीचे वादळ आले होते, शनिवारीही पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दिल्ली हवामान अहवालानुसार, रविवारी पावसाची शक्यता कमी असली तरी वारे वाहणार आहेत. रविवारी सामन्यादरम्यान दिल्लीतील तापमान ३६ अंश सेल्सिअसपर्यंत राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
दिल्ली कॅपिटल्सने आरसीबीविरुद्धचा शेवटचा सामना ६ विकेट्सने आपल्या नावे केला आहे. आयपीएल २०२५ मध्ये दिल्ली हा एकमेव संघ आहे ज्याने आयपीएल 2025 मध्ये आतापर्यंत एक देखील सामना गमावलेला नाही. ४ सामन्यांत ४ विजयांसह, दिल्ली कॅपिटल्स सध्या ८ गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे.