
Pakistan Cricketer Ali Raza Age Fraud
एसीसी पुरुष अंडर-१९ आशिया कप स्पर्धेत पाकिस्तानचा क्रिकेट संघ सध्या सर्वात मजबूत संघ दिसत आहे. गेल्या आयसीसी अंडर-१९ विश्वचषकातील अनेक खेळाडूंचा पाकिस्तान संघात समावेश आहे. यात १८ वर्षीय वेगवान गोलंदाज अली रझाचाही समावेश आहे.
पाकिस्तानचा युवा वेगवान गोलंदाज, अली रझा, सध्या सोशल मीडियावर एका नव्या चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. अली गेल्या चार वर्षांपासून अंडर-१९ क्रिकेट खेळत आहे. त्यामुळे, या १८ वर्षीय गोलंदाजाच्या वयाबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आपल्या भेदक गोलंदाजीसाठी ओळखला जाणारा रझा, पाकिस्तानच्या वयोगट क्रिकेटमध्ये नियमितपणे खेळत आला आहे, परंतु सलग चौथ्यांदा अंडर १९ क्रिकेट खेळल्यामुळे त्याच्यावर वयाबाबत फसवणूक केल्याचा आरोप होत आहे.
अधिकृत कागदपत्रे आणि नोंदींनुसार, पीसीबी आणि आयसीसी या दोन्ही ठिकाणी अली रझाची जन्मतारीख १८ मार्च २००८ अशी नोंदवली आहे. यामुळे नोव्हेंबर २०२६ मध्ये त्याचे वय १८ वर्षे होईल. दोन्हीपैकी कोणत्याही मंडळाने त्याच्याविरुद्ध वयाची फसवणूक केल्याप्रकरणी कोणताही खटला किंवा चौकशी दाखल केलेली नाही. परंतु सोशल मीडिया युजर्स त्याच्या खऱ्या वयाबद्दल सतत प्रश्न विचारत आहेत आणि मीम्सद्वारे त्याची खिल्ली उडवत आहेत.
अली रझा केवळ ज्युनियर क्रिकेटपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर त्याने पाकिस्तान सुपर लीग आणि पाकिस्तानच्या प्रथम-श्रेणी वरिष्ठ देशांतर्गत क्रिकेटमध्येही आपले कौशल्य दाखवले आहे. त्याच्या घातक वेगाने आणि अचूक टप्प्याने पाकिस्तानच्या वरिष्ठ संघाच्या निवडकर्त्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
दक्षिण आफ्रिकेत झालेल्या २०२४ च्या आयसीसी अंडर-१९ विश्वचषक स्पर्धेत आपल्या गोलंदाजीने धुमाकूळ घातल्यावर रझाला पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली. त्या स्पर्धेत त्याने केवळ तीन सामन्यांत नऊ विकेट्स घेतले. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य सामन्यात ३४ धावांत चार विकेट्स घेतले. या प्रभावी कामगिरीमुळे पाकिस्तानचे अंतिम फेरीतील स्थान जवळपास निश्चित झाले होते.
अली रझा याने २०२४ च्या अंडर-१९ विश्वचषक, २०२४ आणि २०२५ च्या अंडर-१९ आशिया कप, २०२६ च्या अंडर-१९ विश्वचषक आणि सध्या सुरू असलेल्या २०२६ च्या अंडर-१९ आशिया कपमध्ये सहभाग घेतला आहे. २०२४ च्या आशिया कप सामन्यात, त्याने भारताचा युवा स्टार वैभव सूर्यवंशीला केवळ १ धावेवर बाद करून आपल्या संघाला ४३ धावांनी विजय मिळवून दिला होता.