CSK vs KKR: लाईव्ह शोमध्ये वीरेंद्र सेहवाग पुन्हा चर्चेत!(फोटो-सोशल मीडिया)
CSK vs KKR : आयपीएल 2025 मधील 25 व्या सामन्यात चेपॉक मैदानावर चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट्स रायडर्स सामना खेळवण्यात आला. या सामन्यात केकेआरने सीएसकेचा दारुण पराभव केला आहे. केकेआरचा हा कर्णधार अजिंक्य रहाणेने नानेफक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. तर सीएसकेने प्रथम फलंदाजी करत20 षटकांत फक्त 103 धावाच केल्या. प्रतिउत्तरात केकेआरने हे लक्ष्य 11 ओव्हरमध्येच पूर्ण करून विजय संपादन केला. चेन्नई सुपर किंग्सचा हा सलग सीझनमधील पाचवा पराभव ठरला आहे. या पराभवानंतर माजी भारतीय खेळाडू वीरेंद्र सेहवागने चेन्नई सुपर किंग्जवर तिखट टीका केली आहे. चेन्नई सुपर किंग्जचा अलीकडील हंगाम चांगला चालला नाही. याबद्दल वीरेंद्र सेहवागने धोनीच्या संघाची टर उडवली आहे.
चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामन्यादरम्यान, धोनी १ धाव घेऊन एलबीडब्ल्यू बाद झाला. मात्र, या निर्णयानंतर बराच गोंधळ निर्माण झाला. धोनी आऊट आहे की नाही? यावर वादविवाद सुरू झाला. या सामन्यात चेन्नईचा संघ २० षटकांत फक्त १०३ धावापर्यंतच पोहचू शकला. त्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सने सामना आपल्या नावे केला.
स्टार स्पोर्ट्सवरील सामन्यानंतरच्या लाईव्ह शोमध्ये जतिन सप्रूकडून सेहवागला विचारण्यात आले की, जर धोनी शेवटपर्यंत राहिला असता तर सीएसकेचा डाव सावरु शकला असता का? यावर वीरेंद्र सेहवागने उत्तर देताना म्हटले की, ‘जर एमएस धोनी एका धावेवर नाबाद राहिला असता तर चेन्नई सुपर किंग्ज प्रथम फलंदाजी करत जास्तीत जास्त १३० धावा करू शकली असती आणि रात्री १०:३० वाजता शो लाईव्ह होण्याऐवजी वेळ रात्री ११:३० झाली असती. यापेक्षा जास्त काही होऊ शकले नसते. कारण कोलकाताने हा सामना १०.१ षटकांत जिंकला.’
वीरेंद्र सेहवागने चेन्नई सुपर किंग्जच्या वाईट प्रदर्शनावर जोरदार टीका करून वाद मिटवला. सेहवाग त्याच्या स्पष्टवक्त्या शैलीसाठी चर्चेत असतो. वीरेंद्र सेहवागने त्याच्या ट्रेडमार्क शैलीत ऊतर देताचा धोनीच्या बाद होण्याचा विषय संपला.
हेही वाचा : IPL 2025 : दिल्लीच्या वादळाचे थैमान, ट्रेंट बोल्टला मैदान सोडून काढावा लागला पळ, ओरडत म्हणाला.. पहा Video
आयपीएल 2025 च्या 18 व्या हंगामात सीएसकेची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. काल केकेआरविरुद्ध झालेला पराभव हा त्यांचा सलग पाचवा पराभव ठरला आहे. चेपॉक येथे खेळण्यात आलेल्या सर्वात कमी धावसंख्येमुळे घरच्या मैदानावर सीएसकेचा सलग तिसरा पराभव झाला. केकेआरच्या शानदार गोलंदाजीसमोर सीएसकेच्या फलंदाजांना तग धरता आला नाही. त्यामुळे सीएसके संघ 103 ढवाच करू शकला आणि केकेआरने २ विकेट गमावून हे लक्ष्य पूर्ण केले.