भारतीय क्रिकेटसाठी (Indian Cricket) रविवारी (२ एप्रिल) सकाळी एक दु:खद बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचे माजी दिग्गज क्रिकेटर सलीम दुर्रानी यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी निधन झाले आहे (Former Indian cricketer Salim Durani passed away at the age of 88). गुजरातमधील जामनगरमध्ये (Jamnagar Gujarat) आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांची कॅन्सरशी झुंज अपयशी ठरली.
अर्जुन पुरस्काराने (Arjuna Award) सन्मानित झालेले दुर्रानी हे पहिले भारतीय क्रिकेटपटू (First Indian Cricketer) आहेत. दुर्राणी यांना १९६० मध्ये अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दुर्रानी यांनी भारतासाठी एकूण २९ कसोटी सामने खेळले आणि या कालावधीत १२०२ धावा केल्या, ज्यात १ शतक आणि ७ अर्धशतकांचा समावेश आहे, शिवाय ७५ बळी घेतले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विट करून सलीम दुर्रानी यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आणि श्रद्धांजली वाहिली. ते म्हणाले की दुर्राणी हे क्रिकेटचे दिग्गज आणि स्वतःमध्ये एक संस्था आहेत. जागतिक क्रिकेटमध्ये भारताच्या विकासात त्यांचा मोलाचा वाटा होता. मैदानावर आणि मैदानाबाहेरही ते त्यांच्या खास शैलीसाठी ओळखले जात असत.
Salim Durani Ji had a very old and strong association with Gujarat. He played for Saurashtra and Gujarat for a few years. He also made Gujarat his home. I have had the opportunity to interact with him and was deeply impressed by his multifaceted persona. He will surely be missed. — Narendra Modi (@narendramodi) April 2, 2023
फिरकी अष्टपैलू सलीम दुर्रानी यांचा जन्म ११ डिसेंबर १९३४ रोजी काबूल, अफगाणिस्तान येथे झाला. मात्र दुर्रानी केवळ ८ महिन्यांचे असताना त्यांचे कुटुंब पाकिस्तानातील कराची येथे स्थायिक झाले होते. यानंतर भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाल्यावर दुर्रानी यांचे कुटुंब भारतात आले.
दुर्रानी यांनी ६०-७० च्या दशकात आपल्या अष्टपैलू कामगिरीने क्रिकेट विश्वात एक वेगळी ओळख निर्माण केली होती. दुर्रानी हे भारताच्या क्रिकेट इतिहासातील एक तेजस्वी अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखले जातात. १९६० मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मुंबई कसोटीत त्यांनी पदार्पण केले. दुर्रानी आतिशी फलंदाजीसाठी ओळखले जात होते. यासोबतच दुर्रानी प्रेक्षकांच्या सांगण्यावरून षटकार मारण्यासाठीही प्रसिद्ध होते.
सलीम दुर्रानी यांनी शेवटचा कसोटी सामना फेब्रुवारी १९७३ रोजी मुंबईत इंग्लंडविरुद्ध खेळला होता. त्यानंतर १९७३ मध्येच क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी चित्रपटसृष्टीतही हात आजमावला. सलीमने ‘चरित्र’ या बॉलिवूड चित्रपटात काम केले होते. या चित्रपटात परवीन बाबी ही अतिशय सुंदर नायिका होती.






