फोटो सौजन्य - X
भारताचा स्टार क्रिकेट खेळाडू विराट कोहली याने भारतीय क्रिकेटला उंचीवर नेले आहे. त्याने त्याच्या कॅप्टन्सीमध्ये भारताचा संघाने ऑस्ट्रेलियाला त्याच्या घरच्या मैदानावर पराभूत केले आहे. सोशल मिडीयावर पोस्ट शेअर करुन विराट कोहलीने कसोटीला रामराम केला. १२ मे २०२५ रोजी भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने अचानक कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करून सर्वांना आश्चर्यचकित केले. त्याच्या निर्णयाने जुने खेळाडू आणि प्रशिक्षकही थक्क झाले. भारताच्या क्रिकेट चाहत्यांनी सोशल मिडीयावर त्याच्या भावना व्यक्त केल्या. भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री म्हणाले की, विराट कदाचित मानसिकदृष्ट्या थकला असेल, त्यानंतर त्याने हा निर्णय घेतला.
दरम्यान, विराट कोहलीचे जवळचे मित्र आणि भारताचे माजी फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर म्हणाले की, त्यांनी विराटला आणखी काही वर्षे कसोटी क्रिकेट खेळावे असे पटवून देण्याचा खूप प्रयत्न केला होता, परंतु त्यांनी आपला निर्णय घेतला होता आणि निवृत्तीच्या निर्णयावर ठाम होते. कोहलीच्या कसोटी निवृत्तीच्या निर्णयाबाबत संजयने आता एक विधान केले आहे आणि म्हटले आहे की त्याची भावनिक पोस्ट वाचल्यानंतर त्याला खूप दुःख झाले आहे.
Sanjay Banger said – “When Virat Kohli announced his retirement from Test Cricket, It was sad and heartbreaking day for me”. pic.twitter.com/RflPBdm8Oq
— Tanuj (@ImTanujSingh) May 17, 2025
खरंतर, संजय बांगर यांनी जिओ हॉटस्टारवर म्हटले आहे की, विराट कोहलीने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली तेव्हा त्याला खूप वाईट वाटले. संजय म्हणाला की, विराट त्याच्या काळातील एक उत्तम खेळाडू होता. त्याने विराटला समजावून सांगितले की त्याच्यात अजूनही चांगले कसोटी क्रिकेट शिल्लक आहे. पण विराटने मनाशी ठरवले होते आणि जेव्हा तो काही ठरवतो तेव्हा तो मागे हटत नाही.
बांगर म्हणाले की, आपण विराटच्या निर्णयाचा आदर केला पाहिजे. आपल्या देशात लोक कोणालाही सहजासहजी जाऊ देत नाहीत, पण विराटने योग्य वेळ निवडली. जेव्हा लोक “आता का?” असे विचारत होते तेव्हा त्याने सन्यास घेतला. अनेकदा एक महान खेळाडू अशा प्रकारे योग्य वेळी निर्णय घेतो.