Asia Cup 2025: Iyer dropped from the squad! 'He only left his favourite players out..' Former opener accuses head coach Gautam Gambhir
Asia cup 2025 : 9 सप्टेंबरपासून आशिया कप 2025 या स्पर्धेला सुरवात होणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. बीसीसीआय निवड समितीचेअध्यक्ष अजित आगरकर यांनी 15 सदस्यीय संघ जाहीर केला असून सूर्यकूमार यादवला संघाचा कर्णधार म्हणून निवडण्यात आले तर शुभमन गिल संघाचा उपकर्णधार असणार आहे. भारत 10 सप्टेंबरपासून यूएइविरुद्धच्या सामन्यापासून आपल्या मोहिलेमा सुरवात करणार आहे. तत्पूर्वी, संघ निवडीवरून भारतीय क्रिकेट जगतात नाराजीचा सुर दिसून येत आहे, त्याचे कारण म्हणजे आशिया कपसाठी संघात श्रेयस अय्यरला स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे निवड समितीवर टीका होऊ लागली आहे. अशातच आता श्रेयस आणि यशस्वी दोघांना वगळण्यात आल्याने भारताचा माजी सलामीवीर सदागोपन रमेश यांच्याकडून हेड कोच गौतम गंभीर याच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
भारताचा माजी सलामीवीर सदागोपन म्हणाला की, “गौतम गंभीर त्याच्या आवडत्या खेळाडूंनाच पाठिंबा देतो, मात्र जे आवडत नाहीत त्यांना दूर ढकलतो. इंग्लंड विरुद्ध खेळवण्यात आलेली मालिका भारताने बरोबरीत सोडवली आहे. ही मोठी अचिव्हमेंट समजली जात असून त्यामागे भारताची गेल्या वर्षात कसोटी क्रिकेटमध्ये निराशाजनक कामगिरी हे कारण आहे. रवी शास्त्री आणि विराट कोहली या दोघांनी विदेशात सातत्याने कसोटी मालिका जिंकण्याची सवय लावली. आता ट्रॅक रेकॉर्ड बघता इंग्लंडमध्ये मालिका बरोबरीत सोडवणं हीच एक गंभीरची अचिव्हमेंट मानतय येईल” असं सदागोपन रमेशने त्याच्या युट्यूब चॅनेलवर म्हटलं आहे.
सदागोपन पुढे म्हणाला की, “भारताला चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून देणं हीच गंभीरची मोठी कामगिरी असून यामध्ये श्रेयसकडून निर्णायक भूमिका बजावण्यात आली होती. त्यानंतर देखील गंभीर श्रेयसला सपोर्ट करत नसल्याचे दिसत आहे. यशस्वी सारखे खेळाडू हे एक्स फॅक्टर ठरत असतात. त्यामुळे त्याला सर्व फॉर्मेटमध्ये खेळवायला पाहिजे. त्याला राखीव म्हणून ठेवणं अयोग्य आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीत केलेली कामगिरी पाहता अय्यरला एकदिवसीय संघात कायम ठेवायला पाहिजे होते. खेळाडूंना समर्थन द्यायला हवं, जेणेकरुन त्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि कामगिरी कायम राहिल”, असंही सदागोपन रमेशने म्हटलं.
हेही वाचा : पृथ्वी शॉचे एक शतक ठरले गुणकारी! नवनवीन ऑफर घेऊन IPL फ्रेंचायझींची लागली रांग; मिनी लिलावात दिसेल परिणाम
एकदिवसीय संघाच्या कर्णधारासाठी श्रेयस अय्यरचे नाव अद्याप चर्चेत आले नसले तरी तो एकदिवसीय संघाचा कर्णधार होण्याच्या शर्यतीत आहे हे नकारून चालणार नाही. एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याची कामगिरी शानदार राहिली आहे. एकदिवसीय विश्वचषकात त्याने ११ सामन्यांमध्ये ६६.२५ च्या सरासरीने ५३० धावा फटकावल्या आहेत. त्याने टीम इंडियाला अंतिम फेरीत पोहचवण्यात मोठे योगदान दिले आहे. जरी ऑस्ट्रेलिया अंतिम फेरीत विजेता ठरला होता. या वर्षी, त्याने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये देखील ४८ पेक्षा जास्त सरासरीने २४३ धावा केल्या होत्या. तो टीम इंडियाकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला होता.