Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

The Hundred League : चालू सामन्यात कोल्ह्याची एंट्री! भीतीने मैदानातील खेळाडूंना फुटला घाम, खेळही थांबला; पहा व्हिडीओ

द हंड्रेड क्रिकेट लीगमधील व्हल इन्व्हिन्सिबल्स आणि लंडन स्पिरिट यांच्यातील सलामी सामन्यात अचानक कोल्हा चालू सामन्यात अचानक कोल्हा मैदानात धावत सुटला. यावेळी सामना काही वेळ थांबवावा लागला होता.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Aug 06, 2025 | 07:03 PM
The Hundred League: Suddenly a fox enters the current match! The players on the field sweat in fear, the game also stopped; Watch the video

The Hundred League: Suddenly a fox enters the current match! The players on the field sweat in fear, the game also stopped; Watch the video

Follow Us
Close
Follow Us:
  • इंग्लंडच्या टी-२० लीग द हंड्रेडमधील चालू सामन्यात कोल्ह्या मैदानावर धावत सुटला.
  • कोल्ह्याला मैदानात बघून खेळाडूंमध्ये भीतीचे वातावरण.
  • ओव्हल इन्व्हिन्सिबल्स आणि लंडन स्पिरिट यांच्यातील सामन्यात घडला प्रकार.

The Hundred League : क्रिकेटच्या चालू सामन्यात अनेकदा काही ना काही अडथळे येतात, ऐनवेळी सामना थांबवाव देखील लागतो. कधी कुत्रे तर कधी किड्यांची रेलचेल कधी तर सापांचा वावर देखील मैदानात बघायला मिळाला आहे. आता तर चक्क कोल्ह्याने चालू सामन्यात प्रवेश केला आहे. कोल्हा मैदानात येताच मैदानातील खेळाडूंना चांगलाच घाम फुटला आहे. कोल्ह्याच्या भीतीने चालू सामना काही वेळ थाबंवावा लागला. इंग्लंडच्या टी-२० लीग द हंड्रेडमध्ये हा प्रकार घडला आहे.

हेही वाचा : IND vs ENG : ‘..तर इंग्लंड जिंकला असता’, भारताविरुद्ध पराभव जिव्हारी! इंग्लंडच्या माजी कर्णधार वॉनने तोडले अकलेचे तारे

द हंड्रेड क्रिकेट लीग आजपासून म्हणजेच ६ ऑगस्टपासून लंडनमधील ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर सुरू झाली आहे. उद्घाटन सामना ओव्हल इन्व्हिन्सिबल्स आणि लंडन स्पिरिट यांच्यात खेळवण्यात आला आहे. या सामनादरम्यान, एका कोल्ह्याने वेगाने मैदानात प्रवेश केला आणि तो मैदानात धावत सुटला. यावेळी मैदानावर चांगलाच गोंधळ उडाला. कोल्ह्याच्या प्रवेशाने खेळाडू, समालोचकांसह प्रेक्षक देखील आश्चर्यचकित झालेले दिसून आले.

 

There’s a fox on the field! 🦊 pic.twitter.com/3FiM2W90yZ

— Sky Sports Cricket (@SkyCricket) August 5, 2025

कोल्हा मैदानावर सगळीकडे धावत निघाला आणि मैदानाबाहेर गेला. स्टेडियममध्ये बसलेले प्रेक्षक टाळ्यांच्या कडकडाटात त्याचे स्वागत करत असल्याचे दिसून आले. पण, मैदानावर उभ्या असलेल्या खेळाडूंचा मात्र चांगलाच थरकाप उडाला. हा सर्व प्रकार सामन्याच्या दुसऱ्या डावात घडुन आला. यजमान लंडन स्पिरिटने दिलेल्या ८१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना ओव्हल इन्व्हिन्सिबल्स फलंदाजीला उतरला. लंडन स्पिरिटचा वेगवान गोलंदाज डॅनियल वॉरल गोलंदाजी करत असताना मध्ये अचानक कोल्हा दिसला.

हेही वाचा : IND vs ENG : DSP सिराजचे मायदेशात जंगी स्वागत! एचसीएचा खास बेत; व्हिडिओ पहा

सामन्याची स्थिती..

ओव्हल इन्व्हिन्सिबल्सने लंडन स्पिरिटचे ८१ धावांचे माफक लक्ष्य केवळ ६९ चेंडूत पूर्ण केले आणि सहा विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. रशीद खान आणि सॅम करन यांनी चेंडूने उत्कृष्ट कामगिरी करून दाखवली. दोघांनीही प्रत्येकी तीन विकेट्स काढल्या. रशीदला सामनावीर घोषित करण्यात आले. त्याने ११ धावांत ३ विकेट्स घेतल्या. शीदने सामन्यानंतर सांगितले की, “विजयाने सुरुवात केल्याने चांगले वाटले, मी गेल्या काही महिन्यांपासून गोलंदाजी केलेली नव्हती, परंतु गेल्या दहा वर्षांत मी जितके क्रिकेट खेळलो आहे त्याची मला मदत होते.”

Web Title: Foxs entry in the current match of the hundred league watch the video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 06, 2025 | 07:02 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.