Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

France Beat Morocco: एम्बाप्पे-डेम्बेलेचा जलवा! फ्रान्सने मोरोक्कोला हरवत मारली सेमीफायनलमध्ये धडक

France Beat Morocco In FIFA 2026 enters Semifinal: फ्रान्सने उपांत्यपूर्व फेरीत मोरोक्कोवर २-० ने विजय मिळवून फिफा विश्वचषक २०२६ च्या उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले. दुसऱ्या हाफमध्ये किलियन एम्बाप्पे आणि उस्मान डेम्बेले (६६') यांनी केलेल्या गोलमुळे फ्रान्सला एक मोठा विजय मिळाला.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 10, 2026 | 04:11 PM
photo- social media

photo- social media

Follow Us
Follow Us:
  • एमबाप्पे-डेम्बेलेचा जलवा
  • मोरोक्कोला हरवत मारली सेमीफायनलमध्ये धडक
  • फ्रान्सचा सेमिफायनलचा सामना कधी?
फिफा विश्वचषक २०२६ ( FIFA World Cup 2026) स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीत फ्रान्सने मोरोक्कोवर दणदणीत विजय मिळवला. फ्रान्सने मोरोक्कोचा २-० ने पराभव करून सलग तिसऱ्यांदा उपांत्य फेरीत प्रवेश केला. किलियन एम्बाप्पे आणि उस्मान डेम्बेले यांच्या गोल्सने फ्रान्सला एक मोठा विजय मिळवून दिला. आता उपांत्य फेरीत त्यांचा सामना बेल्जियम आणि स्पेन यांच्या सामन्यातील विजेत्याशी होईल.

भारतीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच असे घडले! टी20 मध्ये टीम इंडियाची मोठी नामुष्की; Shreyas Iyer च्या नावावर नकोसा विक्रम

पहिल्या हाफमध्ये बुनूने अडवली एम्बाप्पेची पेनल्टी

फ्रान्सने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ खेळला. पाचव्या मिनिटाला, मोरोक्कन गोलकीपर यासिन बुनूने डायोट उपामेकानोचा हेडर उत्कृष्टपणे वाचवला. त्यानंतर, नुसेर माझराउईने बॉक्समध्ये एम्बाप्पेवर फाऊल केल्यामुळे फ्रान्सला पेनल्टी मिळाली. परंतु, बुनूने कर्णधार एम्बाप्पेची पेनल्टी उत्कृष्टपणे वाचवली आणि संपूर्ण पहिला हाफ ०-० असाच राहिला.

दुसऱ्या हाफमध्ये फ्रान्सचा दबदबा

दुसऱ्या हाफमध्येही फ्रान्सने दबाव कायम ठेवला आणि ६० व्या मिनिटाला, एमबाप्पेने बॉक्सबाहेरून एक अप्रतिम शॉट मारून गोल केला आणि फ्रान्सला १-० अशी आघाडी मिळवून दिली. या विश्वचषकातील हा त्याचा आठवा गोल होता. आठ गोलांसह गोल्डन बूटच्या शर्यतीत आघाडीवर आहे. एम्बाप्पेच्या गोलनंतर अवघ्या ६६ व्या मिनिटाला, फ्रान्सच्या डेम्बेलेने गोल करून फ्रान्सला २-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर फ्रान्सने पूर्ण सामन्यावर नियंत्रण ठेवत मोरोक्कोला कमबॅक करण्याची कोणतीही संधी दिली नाही.

या विजयामुळे फ्रान्सने संघाने सलग तिसऱ्यांदा विश्वचषक स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे . फ्रान्सने २०१८ मध्ये विश्वचषक जिंकला होता आणि २०२२ मध्ये उपविजेतेपद पटकावले होते. आता, हा संघ पुन्हा एकदा अंतिम फेरी गाठण्याच्या तयारीत असेल.

A third straight Semi-final secured for France. 🇫🇷#FIFAWorldCup — FIFA World Cup (@FIFAWorldCup) July 9, 2026

या सामन्यात एमबाप्पेने- डेम्बेलेने नोंदवले मोठे विक्रम

किलियन एमबाप्पेने या विश्वचषकातील सर्व सहा सामन्यांमध्ये गोल केले असून तो गोल्डन बूटच्या शर्यतीत आघाडीवर आहे. यासह विश्वचषकात कारकिर्दीतील सर्वाधिक गोल करण्याच्या बाबतीत आता एमबाप्पे (२०) फक्त लिओनेल मेस्सी (२१) च्या मागे आहे. उस्मान डेम्बेले विश्वचषकाच्या एकाच हंगामात पाच गोल करणारा तिसरा फ्रेंच खेळाडू ठरला.

फ्रान्सचा सेमिफायनलचा सामना कधी?

फ्रान्सने फिफा विश्वचषक २०२६ च्या उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे, जिथे त्यांचा सामना स्पेन किंवा बेल्जियम यांच्यापैकी एकाशी होईल. स्पेन विरुद्ध बेल्जियम सामना आज रात्री १२:३० वाजता आहे. या सामन्याचा विजेता उपांत्य फेरीत फ्रान्सशी सामना करेल. फ्रान्सचा उपांत्य फेरीचा सामना बुधवार, १५ जुलै रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री १२:३० वाजता सुरू होईल.

Shreyas iyer च्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने गमावली मालिका, आता नंबर-1 रँकिंगही धोक्यात, कसे बदलले समीकरण

Web Title: France beat morocco fifa world cup 2026 semifinal mbappe dembele goals

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 10, 2026 | 03:29 PM

Topics:  

  • Fifa World Cup
  • Football Tournament
  • France

संबंधित बातम्या

France Student Protest : ‘इस्लाम फ्रान्सवर ताबा मिळवतोय’; ट्रुथ सोशल’वर ट्रम्प यांची वादग्रस्त पोस्ट; आंदोलनाचा विस्फोटक उद्रेक
1

France Student Protest : ‘इस्लाम फ्रान्सवर ताबा मिळवतोय’; ट्रुथ सोशल’वर ट्रम्प यांची वादग्रस्त पोस्ट; आंदोलनाचा विस्फोटक उद्रेक

Big Breaking:फ्रान्समध्ये विद्यार्थ्यांचा उद्रेक; शाळा बंद, रस्त्यावर आंदोलन
2

Big Breaking:फ्रान्समध्ये विद्यार्थ्यांचा उद्रेक; शाळा बंद, रस्त्यावर आंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.