
An se young Defeated PV sindhu
फ्रेंच ओपन २०२६ च्या अंतिम सामन्यात पीव्ही सिंधूने जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या ॲन से यंगला कडवे आव्हान दिले. परंतु जोरदार सुरुवात करूनही तिने सामना गमावला. सिंधूने अंतिम सामन्याची सुरुवात आक्रमकपणे केली आणि उत्कृष्ट खेळ करत पहिला सेट २१-१६ ने जिंकला. २०२३ च्या बॅडमिंटन आशिया चॅम्पियनशिपनंतर सिंधूने यंगविरुद्ध गसेटम जिंकण्याची ही पहिलीच वेळ होती. परंतु, दक्षिण कोरियाच्या यंगने जोरदार पुनरागमन करत दुसरा सेट २१-११ ने जिंकून सामना बरोबरीत आणला.
निर्णायक गेममध्ये, सिंधूने पुन्हा एकदा आक्रमक सुरुवात केली आणि ८-५ अशी आघाडी घेतली. परंतु, यंगने कमबॅक करत भारतीय खेळाडूवर दबाव आणला आणि तिसरा सेट २१-१२ ने जिंकून सामना आपल्या नावावर केला. या विजयासह, या दक्षिण कोरियन खेळाडूने सिंधूविरुद्ध आपला सलग ११ वा विजय नोंदवला. यासोबतच, ॲन यंगने सलग तिसऱ्यांदा चॅम्पियन बनून इतिहास रचला. सलग तीन वेळा हे विजेतेपद पटकावणारी ती जगातील पहिली खेळाडू ठरली.
३१ वर्षीय पीव्ही सिंधूने उपांत्य फेरीच्या सामन्यात जपानच्या हिना अकेचीचा २१-१०, २०-२२, २१-१६ असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. हा रोमांचक सामना एक तास आणि १३ मिनिटे चालला. सिंधूने यापूर्वी याच वर्षी जुलैमध्ये जपान ओपन सुपर ७५० चे विजेतेपद पटकावले होते. त्यामुळे, फ्रेंच ओपनच्या अंतिम सामन्यात तिला या वर्षातील दुसरे सुपर ७५० विजेतेपद जिंकण्याची संधी होती, परंतु तिला त्यात अपयश आले.
Harmanpreet Kaur चा मैदानात राडा! कर्णधारपद सोडल्यानंतर ठोकलं खणखणीत शतक; मिताली राजचा विक्रम मोडला