IND Vs ENG: Gambhir's inappropriate gesture in the ongoing match! Question mark on the head coach's actions; Watch Video
IND Vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील तिसरा सामना ऐतिहासिक लॉर्ड्सवर खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी आपला दबदबा दाखवून दिला आहे. भारतीय गोलंदाजानी इंग्लंडला दुसऱ्या डावात १९२ धावांवर रोखले. प्रतिउत्तरात भारताने चौथ्या दिवसाअखेर ४ गडी गमावत ५८ धावा केल्या होत्या.आज भारत हा सामना जिंकण्याच्या खूप जवळ पोहचला आहे. या सामन्यात विजय मिळवणं गिलसेनेनेसह संगःचे प्रशिकक्ष गौतम गंभीर यांच्यासाठी देखील खूप महत्वाचा असणार आहे. परंतु, त्याआधीच गौतम गंभीर यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये गौतम गंभीर लॉर्ड्सच्या गॅलरीत बसून एक शिवी देताना दिसून येत आहे.
भारताचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरचा व्हायरल झालेला व्हिडिओ लॉर्ड्स टेस्टच्या चौथ्या दिवसाच्या खेळा दरम्यानचा असल्याची माहिती समोर येत आहे. इंग्लंडचा दुसरा डाव सुरु होता. टीम इंडिया गोलंदाजी करत होती. व्हिडिओमध्ये चेहऱ्यावरचे हावभाव पाहून गौतम गंभीर नेमकं काय म्हणत असावा? याचा अंदाज लावता येत असून त्याने चालू सामन्यात अपशब्द वापरल्याचे दिसत आहे.
आता प्रश्न हा पडला आहे कि, व्हायरल व्हिडिओमध्ये गौतम गंभीर कुणाला शिवी देत आहे. गंभीर का नाराज आहे? याबाबत अद्याप काही माहिती मिळू शकली नाही. पण व्हिडीओ पाहून असं दिसून येत आहे कि, गंभीर आपल्याच संघातील खेळाडूंवर व्यक्त करत असावा. कदाचित गंभीर आपल्या टीमच्या फिल्ड प्लेसमेंटवर नाराज असल्याचे बोले जात आहे.
Finally Got that Clip😭🔥pic.twitter.com/4LztNZro44
— 𝗣𝗦𝗬𝗖𝗛𝗢²³🇮🇳 (@GoatGambhir97) July 13, 2025
हेही वाचा : एडन मार्करामने WTC फायनलमध्ये शतक झळकावल्यानंतर आता ICC ने केले सन्मानित; रेकॉर्ड बुक हादरवले
लॉर्ड्सवर खेळवण्यात येत असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने टीम इंडियासमोर विजयासाठी १९३ धावांच लक्ष्य ठेवलं आहे. चौथ्या दिवसाचा खेळ समाप्त झाला, तेव्हा भारतीय संघाने ४ विकेट गमावून ५८ धावा केल्या होत्या. पाचव्या दिवशी टीम इंडियाने खेळायला सुरवात केली तेव्हा भारताने पॅन्टच्या रूपात आपली ५ वी विकेट गमावली आहे. आता भारताला १२६ धावांची गरज आहे. मैदानावर केएल राहुल(३९) आणि रवींद्र जडेजा(५) खेळत आहेत. भारताच्या आता ५ विकेट बाकी आहेत. भारताने हा कसोटी सामना आपल्या नावावर केला तर लॉर्ड्समध्ये टीम इंडियाचा हा चौथा विजय ठरणार आहे.