जसप्रीत बुमराह(फोटो-सोशल मीडिया)
Ind vs Eng : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामान्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील तिसरा सामना लॉर्ड्सवर या ऐतिहासिक मैदानावर खेळला जात आहे. या सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने मोठी कामगिरी केली आहे. आता इंग्लंडमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम जसप्रीत बुमराहच्या नावावर जमा झाला आहे.
जसप्रीत बुमराहने इशांत शर्माचा विक्रम मोडीत काढून इतिहास रचला आहे. जसप्रीत बुमराहने फक्त १० सामन्यात ४९ विकेट्स घेण्याची किमया साधली आहे. तर इशांत शर्माने इंग्लंडविरुद्ध इंग्लंडमध्ये ४८ विकेट्स घेण्यासाठी 14 सामने खेळावे लागले. आता इंग्लंडमध्ये बुमराहकडे इशांत शर्मापेक्षा अधिक विकेट्स जमा झाल्या आहेत. त्याने ख्रिस वोक्सला बाद करून ही ऐतिहासिक कामगिरी केली आहे.
हेही वाचा : एडन मार्करामने WTC फायनलमध्ये शतक झळकावल्यानंतर आता ICC ने केले सन्मानित; रेकॉर्ड बुक हादरवले
या सामन्याच्या पहिल्या डावामध्ये जसप्रीत बुमराहने ५ विकेट्स घेऊन इंग्लिश खेळाडूंना चांगलेच जेरीस आणले. तर दुसऱ्या डावात बुमराहला सुरुवातीला एक देखील विकेट मिळवता आली नाही. चौथ्या दिवसाच्या शेवटच्या सत्रामध्ये बुमराहने प्रथम ब्रायडन कार्सची शिकार केली. त्यानंतर, त्याने ५८ व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर ख्रिस वोक्सला आपला बळी बनवले. दुसऱ्या डावात कार्सने १ धाव केली. तर, वोक्स १० धावा करत बाद झाला.
इशांत शर्माकडून भारतासाठी शेवटचा कसोटी सामना नोव्हेंबर २०२१ मध्ये खेळण्यात आला होता. त्याने आतापर्यंत इंग्लंडविरुद्ध एकूण १४ कसोटी सामने खेळले असून ज्यामध्ये त्याने ४८ फलंदाजांना माघारी पाठवले आहे. २०१४ मध्ये त्याने लॉर्ड्स कसोटीच्या दुसऱ्या डावात ७४ धावा देऊन ७ बळी घेतले होते. ही त्याची इंग्लंडमध्ये सर्वोत्तम कामगीरी ठरली.
हेही वाचा : IND Vs ENG : ‘वेळ वाया घालवण्याची उत्तम रणनीती…’, जॅक क्रॉलीच्या कृतीवर मायकेल वॉनचे विधान चर्चेत.
तथापि, इंग्लंडमध्ये भारतासाठी कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम अद्यापही मात्र इशांत शर्माच्याच नावावर जमा आहे. इंग्लंडमध्ये इंग्लंडविरुद्ध १४ कसोटी सामने खेळण्याव्यतिरिक्त, त्याने तेथे न्यूझीलंडविरुद्ध एक कसोटी सामना देखील खेळला आहे. जून २०२१ मध्ये साउथहॅम्प्टन येथे भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल सामना होता, ज्यामध्ये इशांतने एकूण ३ विकेट्स मिळवल्या होत्या.