
IND vs NZ 3rd ODI: Gautam Gambhir and KL Rahul surrender themselves at the feet of Lord Shiva! Performed Bhasma Aarti at Mahakaleshwar Temple; Watch VIDEO.
Gautam Gambhir and KL Rahul at the Mahakaleshwar temple in Ujjain : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरू असून या मालिकेतील तिसरा सामना १८ जानेवारी रोजी इंदूरमध्ये खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी, भारतीय संघाचे प्रशिक्षक गौतम गंभीर आणि स्टार फलंदाज केएल राहुल यांनी शुक्रवारी उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिराला भेट दिली आहे. यावेळी त्यांनी आरतीमध्ये देखील सहभागी झाले आहेत.
हेही वाचा : MIW vs UPW WPL 2026 : नॅट सायव्हर-ब्रंटचा WPL मध्ये धुराळा! ‘ही’ किमया साधत संयुक्तपणे आली अव्वलस्थानी
Ujjain, Madhya Pradesh: Indian cricket team coach Gautam Gambhir visited Mahakaleshwar Temple on Friday and attended the Bhasma Aarti of Baba Mahakal. (Video Source: Mahakal Mandir) pic.twitter.com/PSlf2q5F1z — IANS (@ians_india) January 16, 2026
गौतम गंभीरने मंदिरात भस्म आरतीत भाग घेतला आणि भगवान शिवाच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एकाची पूजा देखील केली. दर्शनानंतर, त्याच्याकडून भाविकांसाठी केलेल्या व्यवस्थेचे कौतुक करण्यात आले. तसेच पूजा सुरळीत पार पडल्याबद्दल समाधान देखील व्यक्त केले. गंभीर म्हणाला की, “व्यवस्था खूप चांगली होती आणि दर्शन सोपे होते. मला खात्री आहे की मी लवकरच परत येणार.”
केएल राहुलने भगवान शिवाच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एकावर प्रार्थना केली आणि नंदीची देखील पूजा केली. केएल राहुल हा महाकालेश्वर मंदिरात नियमित येत असतो. आयपीएल २०२४ सुरू होण्यापूर्वी, त्याने त्याच्या पालकांसह भस्म आरतीला उपस्थिती राहिली. तसेच स्पर्धेत त्याच्या संघाच्या यशासाठी प्रार्थना देखील केली. यापूर्वी २०२३ मध्ये इंदूर कसोटीपूर्वी त्याने त्याची पत्नी अथिया शेट्टीसह मंदिराला भेट दिली होती.
Ujjain, Madhya Pradesh: Captain KL Rahul visited the Shri Mahakaleshwar Temple today. pic.twitter.com/SUeOneMb6w — IANS (@ians_india) January 16, 2026
भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक सीतांशू कोटक देखील पहाटे ४ वाजता गंभीरसोबत भस्म आरतीसाठी उपस्थित होते. दोन्ही प्रशिक्षकांनी सुमारे दोन तास नंदी हॉलमध्ये बसून आगामी सामन्यात भारतीय संघाच्या यशासाठी यशासाठी प्रार्थना केल्याची माहीत समोर आली आहे. आरती संपल्यानंतर, त्यांनी मंदिराच्या उंबरठ्यावरून भगवान महाकालचे दर्शन घेतले आणि पारंपारिक विधीनुसार नंदीला पाणी अर्पण केले. गौतम गंभीरची ही पहिलीच मंदिरात भेट नाही; तर गेल्या पाच महिन्यांत त्याने त्याच्या कुटुंबासह अनेक वेळा मंदिराला भेट दिली आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा सामना १८ जानेवारी रोजी इंदूरमध्ये होणार आहे. या सामन्याच्या निकालावर मालिका विजय कुणाच्या पारड्यात पडेल हे कळणार आहे. या मालिकेत भारताने एक सामना जिंकला आणि दुसरा न्यूझीलंडने जिंकला आहे. त्यामुळे आता मालिका १-१ अशी बरोबरीत आहे.