भारताचा संघ : भारताचा संघ लवकरच श्रीलंका दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. त्यासाठी आज किंवा १९ जुलै रोजी भारतीय संघाची घोषणा केली जाईल. यामध्ये कोणत्या खेळाडूंना संधी मिळणार आहे हे पाहणे महत्वाचे ठरेल. कारण गौतम गंभीरच्या (Gautam Gambhir) कोचिंगमध्ये भारताचा संघ पहिल्यांदाच दौऱ्यावर जाणार आहे. असे सांगण्यात येत आहे की भारताच्या संघामध्ये आता मोठे बदल करण्यात येणार आहेत. टीम इंडियामध्ये कोणते बदल होणार हे पाहणे महत्वाचे ठरेल. २७ जुलैपासून भारताच्या संघ श्रीलंकेविरुद्ध T२० मालिका खेळणार आहे. बीसीसीआय ने अधिकृतपणे संघाची घोषणा केलेली नाही.
राहुल द्रविडच्या (Rahul Dravid) कोचिंगमध्ये T२० विश्वचषक जिंकला. त्यानंतर आता राहुल द्रविडच्या जागेवर गौतम गंभीरची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे आता असे भाकीत करण्यात आले आहे की, संघामध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे. गौतम गंभीरच्या कार्यकाळामध्ये अनेक जे खेळाडू संघामध्ये नाही आहेत ते पुनरागमन करू शकतात. या यादीत स्टार वेगवान गोलंदाज नवदीप सैनीचा (Navdeep Saini) समावेश आहे. आता गंभीरच्या कार्यकाळात सैनीचे नशीब चमकू शकतो.
‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेशी बोलताना गंभीरच्या प्रशिक्षकाने सांगितले की, खरं तर, गौतम गंभीरचे बालपणीचे प्रशिक्षक संजय भारद्वाज म्हणाले की, त्याच्यात खेळाडूंमध्ये सर्वोत्तम गोष्टी आणण्याची क्षमता आहे. तो नवदीप सैनीसारख्या खेळाडूंची निवड करू शकतो. तो भारतीय सेटअपमध्ये कुलदीप यादव आणि नवदीप सैनी सारख्या खेळाडूंची निवड करू शकतो. ते त्याचे उत्पादन आहेत.
भारताचा खेळाडू नवदीप सैनी हा टीम इंडियासाठी तीनही फॉरमॅटमध्ये खेळला आहे. २०२१ मध्ये त्याने शेवटचा सामना खेळाला होता त्यानंतर त्याला संघामध्ये स्थान मिळाले नाही. श्रीलंकेविरुद्ध त्याने शेवटचा सामना खेळाला होता त्यानंतर त्याला संधी मिळाली नाही. टीम इंडियासाठी सैनीने आतापर्यत २ कसोटी सामने, ८ एकदिवसीय सामने आणि ११ T२० सामने खेळले आहेत.